सोलापूर : सोलापूर शहारातील गणपती घाटानजीकच्या सकुबाई हिराचंद नेमचंद कन्या प्रशालेमध्ये दुर्मीळ सहस्त्रदल कमळ उमलले आहे. या फुलाला 10, 20 नव्हे, तर तब्बल 1008 पाकळ्या आहेत. सहस्त्रदल कमळ पुष्प हे सोलापुरात प्रथमच उमलले असल्याने बागप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती कमळप्रेमी रेवती कुलकर्णी यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
सहस्त्रदल उमललेल्या रोपाला एकूण 3 कळ्या असून, त्यापैकी 2 कळ्या उमलल्या आहेत. थाउजंड पेटल या नावाने हे फूल ओळखले जाते. कमळप्रेमी रेवती कुलकर्णी यांनी या सहस्त्र कमळ फुलाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने या फुलाचे झाड लावले होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कारगिल युद्धाचा देखावा, पुण्यात कुठे पाहता येणार, हे आहे लोकेशन, VIDEO
या फुलांचा गुलकंदांप्रमाणे कमल कंद केला जातो. सहस्त्रदल कमळ लावण्याचा कालावधी साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिना असतो. कारण सरती थंडी व लागता उन्हाळा असे तापमान या महिन्यांत मिळते. मार्चपासून त्याची वाढ व्हायला सुरुवात होते व नंतर ते फुलायला लागते.
भाणोरा वाजवून केली जाते गौराईची कान उघडणी, कोल्हापुरातील नेमकी ही परंपरा आहे तरी काय, VIDEO
सहस्रदल कमळाला 1008 पाकळ्या असतात. याचा सुगंधही छान असतो. ही प्रजाती भारतीय आहे. 15 दिवस हे फूल फुललेले राहते. नंतर बाहेरच्या पाकळ्या गळत जातात व आतल्या पाकळ्या उमलत राहतात, अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.