मर्जीतले आणि वशिलेबाज लोकांना टेंडर : रामपुरे
मालवण येथील घटनेनंतर शिल्पकार भगवान रामपुरे म्हणाले, मालवण येथील झालेली घटना दुःखदायक आहे. पुतळा कुणी तयार केला ते महत्त्वाचे नाही. अनेक लोकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या आहेत. याला फक्त चित्रकारच नाही तर अनेकजण जबाबदार आहेत. टेंडरची प्रक्रिया करताना टेंडर कमी किमतीत जाते. त्यामुळे अनुभवी कलाकारांना असे टेंडर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मर्जीतले आणि वशिलेबाज असणाऱ्या माणसांना टेंडर दिला जातो. यामधील तब्बल 40 वर्षांचा अनुभव आहे. टेंडर पद्धतीने काम करणं मी जवळपास 20 वर्षापासून बंद केलं आहे. यातून अनेक अनुभव आले. सुप्रसिद्ध शिल्पकलाकार रामपुरे यांनी पुतळा उभा करण्याच्या पद्धती सांगून कामाचे नियोजन सांगितले. जरी भूकंप आला तरी एवढे मोठे पुतळे पाचशे वर्षांपर्यंत भक्कम राहिले पाहिजेत. टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचेही त्यांनी सांगितलं. पुतळे उभारण्यासंदर्भात रामपुरे यांनी अनेक गोष्टींचा केला खुलासा.
advertisement
वाचा - क्राइम पेट्रोल पाहून केला प्लॅन, 3 वर्षांच्या चिमुकलीचा आईनंच गळा चिरला अन्...
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मालवण येथील घटनेबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे. सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. तसेच 20 ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आलं होतं. पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा, असा कयास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तर पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडलं ही जनभावना, त्यांना ही घटना कशी घडली हे भेटून सांगेन, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.