मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर – कोल्हापूर आणि सोलापूर – पुणे महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. आता महापुराचे पाणी ओसरू लागले आहे. आज सकाळपासून दोन्ही महामार्गांवरून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून महामार्गांवर अडकून पडलेले प्रवासी आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
निसर्गापुढे बळीराजा हरला! 4 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, चिठ्ठी वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी..
सीना नदीला आलेल्या महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने लांबोटी पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी पाणी पातळी वाढल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. रात्री अकरा वाजलेपासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. तर तिऱ्हे येथे महामार्गावर पाणी आल्याने सोलापूर – कोल्हापूर महामार्ग देखील वाहतुकीस बंद करण्यात आला होता. मात्र, आज सकाळपासून पाणी ओसरल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांना होणार आहे.