कॉल डिटेल्स आणि चॅट तपासले
सदर प्रकरणात प्रेयसी पूजा गायकवाडवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पूजाची अटक केली असून तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी फोन कॉल डिटेल्स आणि चॅट तपासले असून त्यात धमकीचे मेसेज आढळले आहेत. मध्ये गोविंद बर्गे याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे.
advertisement
इथंच गोविंदरावांचा पिंजरा झाला
पुजाने गोविंदची धमकी गांभिर्याने घेतली नाही तेव्हाच गोविंदला पूजाचा खरा रंग समजायला हवा होता. पुजाने प्रॉपर्टी नावावर करण्याचा आग्रह धरला त्याचवेळेस गोविंदने कुटूंबियांचा विचार करायला हवा होता, असं गोविंदच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटलं आहे. विवाहित असताना देखील गोविंदने आत्महत्या करण्याआधी बायकोचा आणि आई-वडिलांचा विचार केला नाही, इथंच गोविंदरावांचा पिंजरा झाला, अशी चर्चा आहे.
कुटुंबियांकडून घातपाताचा संशय
दरम्यान, पूजाच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांनी स्वत:च स्वत:वर पिस्तूलमधून गोळी झाडून घेतली. पण गोविंदच्या नातेवाईकांकडून, कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त होतोय, त्यावर पोलिस काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.