युवा शेतकरी रवी पवार सांगतात की, “मजुरी करत असताना आपणही स्वतः काहीतरी करू शकतो, या विचाराने पैसे साठवण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांच्या कष्टातून भांडवल उभे केले आणि स्वतःच्या शेतीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. कोरडवाहू शेतात बोअरवेल खोदून पाण्याची सोय निर्माण केली, ज्यामुळे शेती उत्पादनक्षम झाली.”
कापूस शेतीला दिला फाटा, यशस्वी केली टरबूज लागवड, शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं लाखात, Video
advertisement
पाणी उपलब्ध झाल्यानंतर पहिल्याच हंगामात भुईमुगाची लागवड केली. योग्य नियोजन, खत व्यवस्थापन आणि वेळेवर देखभाल यामुळे चांगले उत्पादन मिळाले. पहिल्या हंगामातील यश पाहून दुसऱ्या हंगामातही भुईमुगाची लागवड केली. त्यातूनही चांगले उत्पन्न निघाले, असे पवार सांगतात.
सलग दोन हंगामातील यशामुळे रवी पवार यांचा आत्मविश्वास वाढला. पहिल्याच वर्षी दोन्ही हंगाम मिळून सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. याच पद्धतीने शेती करत त्यांनी दरवर्षी भुईमुगाची लागवड सुरू ठेवली. यंदा देखील त्यांनी भुईमुगाच्या माध्यमातून सुमारे सहा लाख रुपयांचा नफा मिळवला असल्याचे सांगितले.
दरम्यान, सध्या त्यांच्या दोन एकर शेतीपैकी एक एकर क्षेत्र कोरडवाहू असून दुसऱ्या एकरमध्ये पाण्याची सोय आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांनी शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधला आहे. रवी पवार यांची ही यशोगाथा कमी क्षेत्रातही योग्य नियोजन आणि मेहनतीने मोठे यश मिळवता येते, हे अधोरेखित करते.





