मुंबईहून गुरुवारी सुटणाऱ्या आणि सोलापूरहून जाणाऱ्या गाडीत नेहमीपेक्षा चार अतिरेक डबे जोडले. विशेष म्हणजे वाढीव क्षमतेच्या या गाडीचे पहिल्याच दिवशी सर्व तिकीट आरक्षण पूर्ण झाले. त्यामुळे सोलापूर, पुणे, ठाणे, कल्याण आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत. तसेच येणाऱ्या दसरा दिवाळी आणि इतर सणांच्या काळात प्रवाशांना आरामदायी आणि सुसाट प्रवास करता येणार आहे.
advertisement
सोलापूरहून दररोज (गुरुवार वगळून) सकाळी 6: 05 वाजता वंदे भारत एक्सप्रेस सुटते आणि मुंबईला दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी पोहोचते. ही ट्रेन अवघ्या 6.30 तासाच्या आत 455 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. तर मुंबईकडून गाडी क्रमांक 22225 (बुधवार सोडून) दररोज सायंकाळी 4 वाजून 5 मिनिटाला सुटते. सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही एक हाय स्पीड रेल्वे आहे.
वंदे भारत गाडीच्या कोचमध्ये बदल करण्यात आला असून गाडीच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच ती धावणार आहे. आतापर्यंत वंदे भारतला 16 डबे होते, त्यात 14 चेअर कार आणि दोन एक्झिक्यूटिव्ह चेअर कार होते. आता डब्याची संख्या 20 झाल्याने 17 चेअर कार आणि 3 एक्झिक्यूटिव्ह चेअर कार उपलब्ध असतील. वंदे भारतच्या या बदलामुळे 286 अतिरिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत.
दरम्यान, सोलापूर – मुंबई वंदे भारत 20 डब्यांची झाल्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळणे सोपे झाले आहे. तसेच वेगवान आणि आरामदायी प्रवास होणार आहे. या गाडीला आता कुर्डूवाडी, पुणे, कल्याण तसेच दादर या ठिकाणी थांबे आहेत.






