TRENDING:

Solapur News: नवरात्रौत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन मिरवणुकीत ही चूक नकोच! सोलापूर पोलिसांचे नवे आदेश

Last Updated:

Solapur News: नवरात्री उत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन मिरवणुकीत लेझर लाईट आणि डीजे, डॉल्बीवर बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर – राज्यात सर्वत्र नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नवरात्री उत्सव साजरा होत असून सोलापुरात देखील हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु, नवरात्रीच्या काळातील मिरवणुकांमध्ये प्रखर बीम लाईट,प्लाझमा व लेझर बीम लाईट, तसेच डॉल्बी, डी. जे वापरण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी याबाबत प्रतिबंधक आदेश जारी केले आहेत.
Solapur News: नवरात्रौत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन मिरवणुकीत ही चूक नकोच! सोलापूर पोलिसांचे नवे आदेश
Solapur News: नवरात्रौत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन मिरवणुकीत ही चूक नकोच! सोलापूर पोलिसांचे नवे आदेश
advertisement

नवरात्रौत्सव मंडळे ही मिरवणुकीने शक्तीदेवीची सांगता करतात. त्याच दिवशी धम्मचक्र परिवर्तन दिन देखील असून बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करतात. यावेळी निघणाऱ्या मिरवणुकीत प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटचा वापर होण्याची शक्यता असते. या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांचे डोळे दिपून वाहनावरील नियंत्रण सुटून दुर्घटना घडू शकते. तसेच या लाईटमुळे शक्तीदेवी व धम्मचक्र परिवर्तन मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना देखील धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: लहान मुले आणि वयोवृद्धांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉल्बी, डिजे व लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.

advertisement

Onion Farm: पावसाचं थैमान! शेतातच सडला कांदा, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल, सोलापुरात मोठं नुकसान

सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी काढलेला हा आदेश दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते 3 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 वाजेपर्यंत लागू असणार आहे. सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा दांडिया आयोजकांकडून कार्यक्रमांमध्ये व मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डिजे व लेझर लाईट वापरात आणू नये, असे आदेशात नमूद आहे. आदेशाचा भंग केल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी परिपत्रकाद्वारे दिली. तर या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होताना दिसत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: नवरात्रौत्सव आणि धम्मचक्र परिवर्तन मिरवणुकीत ही चूक नकोच! सोलापूर पोलिसांचे नवे आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल