सोलापूर : कोणाला मुल नाही,कोणी बेघर आहे. कोणाला त्यांची मुल संभाळत नाहीत अशा सर्वांचा संभाळ सोलापुरातील प्रसाद मोहिते हा तरुण करत आहे. यासाठी त्यांनी पाच एकर शेत विकून आणि पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून प्रार्थना फाउंडेशन उभारले आहे. याठिकाणी 70 जणांची देखभाल मोहिते दाम्पत्य करत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग गावाजवळील ईर्लेवाडी हे प्रसाद मोहितेचं मूळ गाव. मुळात प्रसाद हा आत्महत्याग्रस्त कुटुंबातला. वडिलांच्या निधनानंतर आईच्या पदराखाली वाढलेला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुढे शहरात स्थायिक झाला. त्यावेळी शहरात असंख्य निराधार मुलं शिक्षण सोडून पोटासाठी भटकंती करताना दिसली. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात यावं यासाठी काहीतरी करावे, असा विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला. सामाजिक कार्यात काम करत असताना प्रसाद आणि अनुची ओळख झाली. ते दोघेही एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत होते. सामाजिक जाणीवेतूनच त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली.
advertisement
अस्सल कोल्हापुरी चप्पल, 50 वर्षांपासून सातपुते परिवार करतोय व्यवसाय, तीन पिढ्यांपासून जपली परंपरा
बेघर, अनाथ मुलांना एकत्र करून त्यांना शिक्षण देण्यासाठी शहरातील पालांवर वंचितांची शाळा 2016 साली सुरू केली. समाजकार्याच्या विचाराने झपाटलेल्या या दोघांनी पुढे जाऊन आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला. आयुष्यभर समाजाची सेवा करण्याची शपथ दोघांनी घेतली. दोघांची जात वेगळी असल्यामुळे त्यांना प्रचंड विरोध झाला.
हा विरोध मोडीत काढून त्यांनी आंतरजातीय विवाह केला. स्वतःचे लग्न त्यांनी थाटामाटात न करता सामुदायिक विवाह सोहळ्यात आपल्या सात जन्माच्या रेशीमगाठी बांधल्या. लग्नाला लागणार खर्च त्यांच्याच शाळेतील अनाथ पाच मुलींच्या नावे मुदत ठेव करून ठेवली. लग्नानंतर त्यांना एक गोंडस मुलगी झाली होती. परंतु दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. यातून सावरत त्यांनी त्या चिमुकलीच देहदान केलं.
मोहिते दाम्पत्य प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलं-मुली, निराधार, बेघर अश्या कित्येक मुलांना शिक्षण, संस्कार आणि आधार देण्याचा काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी पाच एकर जमीन विकली आणि पत्नीचा मंगळसूत्र एका बँकेत गहाण ठेवून बेघर लोकांना कायमचा निवारा मिळावा यासाठी ते मोरवरंची येथे वृद्धाश्रम सुरू केलं. प्रार्थना फाउंडेशनमध्ये आजी- आजोबा, लहान मुलं- मुली असे मिळून 70 जणांचा आम्ही सांभाळ करतो, असं प्रसाद मोहिते सांगतो.
प्रसाद मोहिते ( प्रार्थना फाउंडेशन)
9545992026