अस्सल कोल्हापुरी चप्पल, 50 वर्षांपासून सातपुते परिवार करतोय व्यवसाय, तीन पिढ्यांपासून जपली परंपरा
- Reported by:Nikita Tiwari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सातपुते परिवाराने हाताने बनवलेल्या अस्सल कोल्हापुरी या देशभर प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या कोल्हापुरी चप्पल ब्रँडला अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.
निकता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : हल्लीच्या काळात पारंपारिक गोष्टी लोप पावत आहेत. पण अनेक कुटुंब पारंपरिक गोष्टींना जपण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोल्हापूरचे सातपुते परिवार कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करत आहे. सातपुते परिवाराने हाताने बनवलेल्या अस्सल कोल्हापुरी या देशभर प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांच्या कोल्हापुरी चप्पल ब्रँडला अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.
advertisement
कोल्हापूरचे नंदकिशोर सातपुते परिवार हा गेल्या 50 वर्षांपासून पारंपरिक कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करत आहे. कोल्हापूर शहरात जाऊन कच्चा माल आणायचा. त्या मालाचे योग्य ते सगळे मटेरियल विकत घ्यायचे आणि घरी येऊन संपूर्ण कुटुंबासह घरच्या घरीच हाताने पारंपरिक कोल्हापुरी चप्पल बनवायची. असा व्यवसाय सातपुते परिवार तीन पिढ्यांपासून करत आहे.
advertisement
जास्तीत जास्त आपल्या ग्राहकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सातपुते परिवार सोशल मीडियाचा वापर करत आहे. कोल्हापूरची अस्सल पारंपरिक चप्पल ही देशभरात पोहोचण्याचा उद्देश सातपुते परिवारचा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून सातपुते परिवार त्यांचा व्यवसाय लोकांसमोर सादर करत आहे.
सातपुते यांच्याकडे 50 पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पला तुम्हाला विकत घेता येतील. लहान मुलांच्या कोल्हापुरी चप्पलांची किंमत साधारण 150 रुपयांपासून सुरू होते. तर पंधरा वर्ष वयोगटापेक्षा जास्त असलेल्यांसाठी 650 रुपये या कोल्हापुरी चप्पलची किंमत आहे.
advertisement
'कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय काळानुसार बदलत आहे अनेक जण हा व्यवसाय करायचा सोडून नोकरी धंद्याकडे वळले आहे. पण आम्ही आमचा सातपुते परिवार जोपर्यंत आहोत, तोपर्यंत आम्ही आमचा कोल्हापूर चप्पलचा व्यवसाय तसाच सुरू ठेवणार आहेत. यामधून आम्हाला 1 लाख महिन्याला कमाई होत आहे, असं नंदकिशोर सातपुते यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2024 11:24 AM IST
मराठी बातम्या/मनी/
अस्सल कोल्हापुरी चप्पल, 50 वर्षांपासून सातपुते परिवार करतोय व्यवसाय, तीन पिढ्यांपासून जपली परंपरा








