सोलापूर : सोलापूर शहरातील विजापूर नाका परिसरात राज्यकर निरीक्षक या पदावर असलेले बुद्धजय अण्णासाहेब भालशंकर हे एक कौतुकास्पद कार्य करत आहेत. ते समाजातील गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी, स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देत आहेत. यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केली आहे. तर यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून रोजगाराचे साधनही उपलब्ध करुन दिले आहे. सोलापूर या विशेष कार्याचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा जाणून घेऊयात.
advertisement
काय आहे हा उपक्रम -
बुद्धजय अण्णासाहेब भालशंकर हे राज्यकर निरीक्षक पदावर मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी सोलापूरात मागील अडीच वर्षापासुन त्यांनी सम्यक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मोफत सुरू केले. गरीब, होतकरू आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
बुद्धजय भालशंकर यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना पत्रावळी बनवण्याचे मशीन उपलब्ध करून दिली आहे. त्या मशीनद्वारे विद्यार्थी पत्रावळी, द्रोण, नाश्ता प्लेट, बफे प्लेट, यांसारख्या वस्तू तयार करुन त्या मार्केटमध्ये विक्री करतात. तसेच या माध्यमातून आलेल्या उत्पन्नातून स्वतःची आर्थिक गरज विद्यार्थी भागवत आहेत. सम्यक अकॅडमीने कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून चालू केलेल्या उद्योगामार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळत आहे.
वनराईनं वाढवली हुतात्मा स्मारक परिसराची शोभा अन् स्मारकातील वाचनालयात वाचकांची वाढली गर्दी
हालाखीची परिस्थिती असतानासुद्धा आपल्या कुटुंबावर अवलंबून न राहता स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ होत आहे. हे विद्यार्थी स्वतःच्या उत्पन्नातून स्पर्धा परीक्षेला लागणारी पुस्तक आणि राहण्याचा खर्च भागवत आहेत. विशेष म्हणजे या उत्पन्नातून मिळालेले पैसे एक रुपयाचा मोबदलाही बुद्धजय अण्णासाहेब भालशंकर हे घेत नाहीत.
wari 2024 : वारी का काढली जाते? कोण आहेत वारीचे जनक? असा आहे वारीचा भव्य-दिव्य इतिहास
एकीकडे विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा साठी प्रशिक्षण देत आहेत. तसेच दुसरीकडे त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी कोणतेही अडचण येऊ नये म्हणून राज्यकर निरीक्षक यांनी गरीब सम्यक अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत करत कमवा आणि शिकवा ही संकल्पना राबवली आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे.





