advertisement

Solapur News: "तुला घरातून हाकलून देईन"; सुनेच्या एका धमकीने ७३ वर्षांच्या सासऱ्याचा घेतला बळी! सोलापूरात खळबळ

Last Updated:

Solapur News:सुनेच्या सततच्या जाचाला आणि "घरातून हाकलून देईन" या धमकीला कंटाळून सर्जेराव शंकर नायकुडे या वृद्धाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

वृद्धपणी घरच झालं परकं! सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बार्शीत शोककळा
वृद्धपणी घरच झालं परकं! सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बार्शीत शोककळा
सोलापूर: ज्या वयात नातवंडांसोबत खेळायचे, निवांत आयुष्य जगायचे, त्याच वयात एका ७३ वर्षीय वृद्धाला स्वतःच्याच घरात अपमान आणि छळाचा सामना करावा लागला. सुनेच्या सततच्या जाचाला आणि "घरातून हाकलून देईन" या धमकीला कंटाळून सर्जेराव शंकर नायकुडे या वृद्धाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने बार्शीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सुनेविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याात आली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव नायकुडे हे बार्शीत आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र, गेल्या काही काळापासून घरात कौटुंबिक वाद वाढले होते. सून आणि सासरे सर्जेराव यांच्यात खटके वाढले होते. त्यातच सुनेकडून त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात असे. साध्या साध्या गोष्टींवरून त्यांचा अपमान करणे, त्यांना टोमणे मारणे आणि सर्वात भयानक म्हणजे "तुला घरातून हाकलून देईन" अशी धमकी देणे, यामुळे सर्जेराव प्रचंड मानसिक तणावाखाली होते.
advertisement

सन्मानाने जगण्यासाठी टोकाचा निर्णय...

१० मार्च रोजी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घराचा आधारवड असलेल्या सासऱ्याने सुनेच्या रोजच्या धमकावण्याला आणि अपमानाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने वाचवण्याचे प्रयत्न झाले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. ज्या घरात त्यांनी रक्ताचे पाणी करून आयुष्य काढले, त्याच घरात त्यांना जगणे नकोसे झाले, हे ऐकून बार्शीकरांचे डोळे पाणावले आहेत.
advertisement
या प्रकरणी मुलगा महेश नायकुडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur News: "तुला घरातून हाकलून देईन"; सुनेच्या एका धमकीने ७३ वर्षांच्या सासऱ्याचा घेतला बळी! सोलापूरात खळबळ
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement