सोलापूर - जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही यश मिळवता येते, हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती या गावात राहणारा हाजी मलंग शेख या तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. आज त्यांचा स्वतःचा फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग वर्क कारखाना आहे. नेमकं हे यश त्यांनी कसं मिळवलं, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
हाजी मलंग यांनी वयाच्या अठराव्या वर्षी एका लहानशा पत्र्याच्या शेडमध्ये वेल्डिंग करुन देण्याच्या कामापासून सुरुवात केली होती. आज त्यांनी चाचा फेब्रिकेशन अँड वेल्डिंग वर्क या नावाने स्वतःचा कारखाना सुरू केला असून याठिकाणी महिन्याला 10 लाख रुपये पर्यंतची उलाढाल होत आहे.
हाजी मलंग शेख हे आधी फॅब्रिकेशनचे कामे करत होते. त्यानंतर त्यांनी शेतीला लागणारे अवजारे बनवून देण्याच्या कामाला सुरुवात केली. 5 पत्र्याच्या कारखान्यामध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती आणि त्याला महिन्याला 300 रुपये भाडेदेखील होता. शेतीला लागणारे अवजारे शेतकऱ्यांना माफक दरात आणि उत्तम क्वालिटीचे बनवून देत असल्यामुळे हाजी मलंग यांच्याकडून शेतकरी अवजारे बनवून घेत होते.
शेतीतील अवजारे पाहून वेगवेगळे कंपनीतील लोकांनी त्यांच्या कारखान्याला भेट दिली व आम्हालाही असे अवजारे बनवून द्या, अशी विनंती केली. मात्र, हाजी मलंग शेख यांनी असे न करता फक्त शेतकऱ्यांनाच आम्ही अवजारे बनवून देणार असल्याचे सांगितले. शेतीला लागणारे पंजे, दिंड, डोजिरा, पेरणी यंत्र व इतर साहित्य शेतकऱ्यांना माफक दरामध्ये बनवून देतात म्हणून या ठिकाणी हजारो शेतकरी येऊन यंत्रे बनवून घेतात.
परभणी, नांदेड, जामखेड, इंदापूर, मंद्रूप, अक्कलकोट या सर्व भागातून शेतकरी कारखान्याला येऊन शेतीमध्ये लागणारे साहित्य बनवून घेतात. या यंत्र विक्रीतून महिन्याला 10 लाख रुपये पर्यंतची उलाढाल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.