Sangli News : पतीचं निधन, कुटुंबाची परिस्थिती गरिबीची, महिलेनं जिद्दीच्या बळावर केला व्यवसाय, आज होतेय लाखो रुपयांची कमाई

Last Updated:

widow woman success story sangli - माधुरी कुंभार असे या महिलेचे नाव आहे. त्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावातील रहिवासी आहेत. माधुरी कुंभार यांच्या संसारावर असाच काळाचा घाव बसला आणि त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. यानंतर माधुरी मागील 6 वर्षांपासून संसाराचा गाडा पुढे नेत आहेत. 

+
माधुरी

माधुरी कुंभार

प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली - आपल्याकडे पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था असली, तरीही संसाररूपी रथाला पुढे नेण्यासाठी दोन चाके लागतात. यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांची भुमिका तितकीच महत्त्वाची ठरते. अशातच अनेकांवर वाईट प्रसंग येतात. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचं अचानक निधन होते आणि मग घरातील महिलेवर कुटुंबाची जबाबदारी येते. या सर्व परिस्थितीतून महिला मार्ग काढत यशस्वीपणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतात. आज अशाच महिलेची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
माधुरी कुंभार असे या महिलेचे नाव आहे. त्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावातील रहिवासी आहेत. माधुरी कुंभार यांच्या संसारावर असाच काळाचा घाव बसला आणि त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. यानंतर माधुरी मागील 6 वर्षांपासून संसाराचा गाडा पुढे नेत आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, "2015 मध्ये सासऱ्यांचे अचानक निधन झाले. तीनच वर्षानंतर 2018 साली माझे पती अपघातात कायमचे निघून गेले. त्यावेळी माझा मोठा मुलगा 9 वर्षांचा होता. तर धाकटा 9 वर्षांचा होता.
advertisement
घरी वृद्ध सासूबाई, अपंग नणंद आणि मी ,माझी मुलं असे पाच लोकांचं कुटुंब आहे. सासरे आणि नवऱ्याच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. सासू आणि नणंद यांच्या सोबतीने मी आमचा पारंपारिक कुंभार व्यवसाय सुरू ठेवला. अनेक संकटे आली, अनेकदा हतबल झाले. मात्र, परत जिद्दीने उभे राहत आम्ही जगतो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
advertisement
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमचा परंपरागत व्यवसाय असल्याने आम्हाला घरातून बाहेर न जाता जगण्याचे साधन मिळाले. यातच माझे शिक्षण कमी झाले होते. त्यामुळे कुठे अंगणवाडी किंवा आशा सेविका म्हणून नोकरीही पाहता येत नव्हती. मागील वर्षी मी बारावी पूर्ण केली. आता ग्रॅज्युएट होण्याचे माझे स्वप्न आहे. मुलेही शाळेत जातात. सासुबाई , नणंद आणि मी घरचे मिरची कांडप यंत्र, पिठाची गिरणी आणि दोन रोजगारी लावून गणपती बनवण्याचे काम पाहतो. यातून आम्हाला वर्षाकाठी 4 ते 5 लाख रुपये मिळतात. यातूनच आमचा प्रपंचा चालू आहे," असे माधुरी कुंभार यांनी सांगितले.
advertisement
ऊसतोड कामगार बनला यशस्वी व्यावसायिक, चामड्याच्या वस्तूंची विक्री, वर्षाला 5 लाखांचा नफा, VIDEO
ऐन तारुण्यात आलेले विधवापण, दोन मुलांचे भविष्य यातच स्वतःचे कमी शिक्षण, यामुळे माधुरी काही काळ हतबल झाल्या होत्या. पुढे काय होणार? याबाबत त्यांना काही सुचत नव्हतं. अशातच स्वतःला सावरत त्यांनी जिद्दीन जगायचं ठरवले. सासूबाई आणि नणंद यां सोबतीने त्या सासरे आणि नवऱ्याने सुरू केलेले व्यवसाय जिद्दीने पुढे चालवू लागल्या. त्यांच्या कुंभार व्यवसायातून गणपती बनवण्याचा सिझन उत्तम चालतो. यामधून त्या दोन लोकांना रोजगार देतात. तसेच दुर्गा मातेची मूर्ती बनवणे व माठ, घट, मातीच्या चुली अशा मातीच्या वस्तू ही त्या परिसरामध्ये पुरवितात.
advertisement
सध्या माधुरी सर्विसिंग सेंटर, पिठाची गिरणी, मिरची कांडप यंत्र आणि परंपरेने चालत आलेला कुंभार व्यवसाय सांभाळतात. यामध्ये त्यांना सासूबाई नणंद आणि मुलांची भक्कम साथ आहे. सोबतच त्यांनी स्वतःचे अपूर्ण शिक्षण ही पूर्ण करायचे ठरवले आहे. 7 वर्षाच्या काळात अनेक संकटे आली. अनेक संकटांना तोंड देत, अनेकदा हतबल झाल्या, तरी पुन्हा जिद्दीने उभेराहत एकल महिला माधुरी कुंभार संसाराचा गाडा पुढे चालवत आहेत. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli News : पतीचं निधन, कुटुंबाची परिस्थिती गरिबीची, महिलेनं जिद्दीच्या बळावर केला व्यवसाय, आज होतेय लाखो रुपयांची कमाई
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement