अधिवेशनासाठी नवाब मलिक आले तेव्हा त्यांनी विधिमंडळाच्या गेटवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. अजित पवार येत असताना नवाब मलिक गेटवर उभे होते, त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंद बोलणं झालं, यानंतर अजित पवार पुढे निघून गेले.
नवाब मलिकांवरून वाद
याआधी नवाब मलिक यांच्यावर हिवाळी अधिवेशनात वाद झाला होता. नागपूरमध्ये झालेल्या या अधिवेशनावेळी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले होते, त्यामुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला होता, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. मलिकांना महायुतीत घ्यायला विरोध असल्याचं फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट म्हणलं. सत्ता येते, सत्ता जाते पण देश महत्त्वाचा आहे, असंही फडणवीस या पत्रात म्हणाले होते.