शिर्डीत सकाळपासून कर्मचाऱ्यांनी एसटी बसेस डेपोतच उभ्या करुन ठेवल्यात. कोल्यात लालपरीची चाके थांबली आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बससेवेला फटका बसलाय. शेकडो प्रवासी बस स्थानकावर अडकून पडलेत.अमरावतीत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्यसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे या मागणीसाठी आंदोलन केलंय.
एस टी कर्मचाऱ्यांना उद्योग मंत्री उदय सामंत आज दुपारी बारा वाजता भेटणार आहेत. मंत्रालयात ही भेट होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांची उद्या संध्याकाळची भेट ठरली आहे. नेमकं या भेटीत काय चर्चा होणार हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे.
advertisement
नाशिक
ST कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारला. नाशिक मधून ST महामंडळाच्या संपाला सुरुवात झाली.पहाटे 6 वाजल्यापासून नाशिक आगारातील बसेस बंद ठेवण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ST कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा संप केला जात आहे. पहाटे पासून एकही बस आगारातून बाहेर न काढण्याचा कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत.
शिर्डी
लालपरीला ब्रेक एस टी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. एस टी कामगारांच्या आर्थिक मुद्यांची सोडवणूकी करीता संप. काल राज्यभर उग्र निदर्शने झाल्यानंतर एस टी कामगार आजपासून बेमुदत संप. खाजगीकरण बंदी सह आठ मागण्यांकरीत एस टी कामगार संपावर आहेत. सरकारने एस टी कामगारांच्या मागण्यांवर तोडगा न काढल्याने संप केला जात आहे.
पुणे
स्वारगेट बस स्थानकातून बाहेर गावी जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. नाईटसाठी आलेल्या बस फक्त बाहेर पडणार आहेत. ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉप मधील जवळपास 500 च्या वर कर्मचारी संपात सहभागी होणार आहे. पोलिस बंदोबस्त ही स्वारगेट बस स्थानकात वाढवण्यात आला.