या हल्ल्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत तणाव वाढला आहे. पहाटेच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी अचानकपणे सुरेश शिंदे यांच्या घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये सुरेश शिंदे यांच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आक्रमक झाला असून, त्यांनी थेट सत्ताधारी गटावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी हा हल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने अशा प्रकारे भ्याड हल्ला करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
advertisement
या हल्ल्यामुळे जत शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता असल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी अशाप्रकारे हल्ला झाल्याने तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
