मकरध्वज बडे हे एक शेतकरी, परंतु समाजकारणाची ओढ मनात बाळगून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. गावकऱ्यांच्या आणि पक्षाच्या समस्या सोडवताना त्यांनी कित्येक रात्रं-दिवस काम केलं. कार्यकर्ता म्हणून ते प्रस्थापित नेत्यांच्या मागे मेहनत घेत राहिली. परंतु, असे काही प्रस्थापित नेते होते, ज्यांना नव्या उमेदवारांना संधी दिली नाही. सत्य परिस्थिती पाहिली तर राजकारण हे सर्वसामान्यांसाठी नाही असाच एक दृष्टिकोन सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात दाटत आहे.
advertisement
खरं तर शेती करत असताना या शेतकऱ्याला राजकारण आणि समाजकारणाकडे जाण्याची इच्छा झाली. हळूहळू राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणामध्ये स्वतःला झोकून दिलं. जास्तीत जास्त काळ त्यांनी राजकारणासाठी अर्पण केलं. खरं तर मकरध्वज बडे यांनी बरीच स्वप्न पाहिली होती. परंतु वास्तविकता पाहता त्यांना राजकारण सोडून पुन्हा शेतीकडेच वळावं लागलं.
अनेक दशकांची मेहनत आणि कष्ट घेतल्यानंतर देखील, पदरी काहीही पडले नाही म्हणून शेवटी शेतीकडे परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. “राजकारणाच्या गदारोळात तुमचं घरदार विसरू नका. स्वतःचा उद्योग-धंदा करा, कारण शेवटी कामात समाधानी राहणं, हीच खरी प्रतिष्ठा आहे.” असं वक्तव्य नाराज मकरध्वज बडे यांनी केलं.