पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी त्याला जबरदस्तीने वसतिगृहातील एका खोलीत नेले. तेथे रूम स्वच्छ करणे, झाडू मारणे तसेच इतर कामे करण्यास सांगण्यात आली. मात्र, या कामांना नकार दिल्याने संतप्त झालेल्या चार विद्यार्थ्यांनी त्याला लाकडी स्टम्पने जबर मारहाण केली. ही मारहाण सुमारे तीन तास सुरू होती, असा आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
advertisement
मारहाणीत विद्यार्थ्याचा कान निकामी
मारहाण करणारे विद्यार्थी दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोपही पीडित विद्यार्थ्याने केला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याला जबर मार बसला आहेत. विशेष म्हणजे, या मारहाणीत विद्यार्थ्याचा एक कान निकामी झाला असून त्याला नीट ऐकू येत नसल्याची तक्रार डॉक्टरांकडे करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया देण्यास महाविद्यालयाचा स्पष्ट नकार
या घटनेनंतरही संबंधित महाविद्यालय प्रशासनाने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नसून, या प्रकारावर चर्चा करण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास महाविद्यालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
घटनेमुळे संतापाचे वातावरण
दरम्यान, या गंभीर घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रॅगिंगसारख्या बेकायदेशीर आणि अमानवी कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत असून, संबंधित आरोपी विद्यार्थ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अगोदर मुंबईथ रॅगिंगसंदजर्भात एक भयानक घटना घडली होती. 2019 मध्ये रॅगिंगला कंटाळून नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी हिने हॉस्टेलच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :
