TRENDING:

Nitin Gadkari: असं ट्राफिक मॅनेजमेंट राज्यात प्रथमच होणार, नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन

Last Updated:

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील ट्राफिकची समस्या नेहमीचा डोकेदुखीचा विषय ठरला आङे. आता गुजरातच्या धर्तीवर राज्यातील नागपूर शहरात ट्राफिक नियंत्रणासाठी वेगळी शक्कल लढवली जाणार आहे. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींनी घोषणा केली...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर: देशातील मुंबई, पुणे, नागपूर, बंगळूरू, दिल्ली अशा शहरांमध्ये वाहतूक कोंडी हा आता मोठा प्रश्न बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे रस्ते अपघात शहरांमध्ये वाढत आहेत. आता ट्राफिक मॅनेजमेंटसाठी राज्यात वेगळी शक्कल लढवली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गुजरातमधील सूरत पॅटर्न नागपूरात राबवणाच्या मानस असल्याचं स्पष्ट केलं आहे.
News18
News18
advertisement

नेमकं कसं होणार ट्राफिक मॅनेजमेंट:

ब्लॅक स्पॉट शोधून अपघात कमी करण्यासाठी काम सुरू केलं जाणार आहे. सुरतच्या धर्तीवर ट्राफिक मॅनेजमेंटचा अभ्यास होईल. बस किंवा कारचे मोठे अपघात झाल्यास त्वरित आरोग्य सेवा पोहचण्यासाठी अद्ययावत वाहन उपलब्ध करण्यावर भर असेल, असा हा संपूर्ण प्लॅन असणार आहे.

नागपुर शहरात वाहतूक कोंडी, रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भात अपघात निवारण समितीची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडली. यात शहरात होत असलेल्या हिट अँड रनच्या घटना, ब्लॅक स्पॉटमुळे होणारे अपघात हे रोखण्यासाठी उपाययोजना या संदर्भात बैठक पार पडली. रविभवन येथील बैठकीत संबंधित विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह आरोग्य विभाग, नागपूरात वाहतूक जनजागृतीसाठी काम करणाऱ्या एनजीओंचा सहभाग होता.

advertisement

नितीन गडकरी काय म्हणाले?

नागपुरात 800 ते 1000 लोकांचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो. देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. या अपघातात मृत्यमुखी होणारे 65% मृतक हे 18 ते 34 वयोगटातील आहे. "नागपूर शहरात ब्लॅक स्पॉट शोधले." त्यावर काम सुरू असल्याचं समाधान केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. "सुरतमध्ये ट्राफिक व्यवस्था हे एनजीओ सांभाळतात. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात एक टीम सूरतला जाऊन अभ्यास करेल, तशी यंत्रणा आपल्याकडे राबवली जाईल". असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले.

advertisement

Niti Aayog Meet: असा होणार मराठवाडा दुष्काळमुक्त? मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत मांडला प्लॅन

तसेच शाळेसमोरील होणारे अपघात रोखण्यासाठी देखील नागपूर वाहतूक विभागाचं काम  सुरू आहे. अतिक्रमणाचा देखील वाहतूक कोंडीला हातभार असतो. त्याचेही नियोजन केले जाणार आहे. हा पॅटर्न नागपूर शहरात यशस्वी झाल्यास त्याची राज्यातील प्रमुख शहरांत अंमलबजावणी केली जाणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nitin Gadkari: असं ट्राफिक मॅनेजमेंट राज्यात प्रथमच होणार, नितीन गडकरींनी सांगितला प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल