मागील काही दिवसांपासून नितेश राणे हे हिंदुत्ववादीची प्रखर भूमिका मांडत आहेत. यामुळे यापूर्वी त्यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांच्या घरासमोर बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही बॅग नेमकी कुणी ठेवली? बॅगमध्ये काय आहे? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माबिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. बॅगमध्ये नक्की काय आहे? याचा शोध घेतला जात आहे. ही सगळा प्रकार नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर घडला आहे. अशा प्रकारे अज्ञाताने नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बॅग सोडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी बॉम्बस्कॉड कडून बॅगची झडती घेतली जात आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी प्रचार पॅटर्नमुळे त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले होते. यातच अनेक ठिकाणी झालेल्या हिंदुत्ववादी वादग्रस्त भाषण स्टाईलमुळे नितेश राणे चर्चेत आले होते. सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीचा प्रचार जोमात आहे. निवडणुकीच्या काळातच असा प्रकार घडल्याने याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
