काही दिवसांपूर्वी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, अचानक झालेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपमधील वरिष्ठांचा विरोध शिथिल झाला आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
मयूरवर कोणत्या गुन्ह्याची नोंद?
मयूर शिंदे याच्यावर हत्या, खंडणी, पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न तसेच हत्येचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. २०११ साली त्याच्याविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच २०२३ मध्ये खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीप्रकरणीही शिंदेला अटक करण्यात आली होती. मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे. मयूर हा पूर्वी भांडूपमध्ये राहत होता. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात राहायला आला.
advertisement
शिवसेनेकडे मागितली होती उमेदवारी...
२०१७ मध्ये ठाण्यातील सावरकरनगर भागातून शिंदेने शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी त्याला उमेदवारी मिळाली नव्हती. यंदा पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी करत त्याने भाजपमध्ये प्रवेशासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, आचारसंहितेचे कारण पुढे करत हा कार्यक्रम रद्द झाल्याचे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले होते.
त्यानंतर मंगळवारी थेट भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात जाऊन मयूर शिंदेने आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि संदीप लेले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे भाजपमध्येच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही नव्या चर्चांना उधाण आले आहे.
