आगामी जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमदार तानाजी सावंत यांनी आज धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात बोलताना आमदार तानाजी सावंत यांनी तुळजापूर ड्रग्स प्रकरण आणि मंदिर तोडफोड प्रकरण यावरून भाजप आमदारांना पाटील यांना लक्ष्य केले.
तानाजी सावंत यांचा राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा
तुळजाभवानी मंदिरातील गाभारा तोडफोड प्रकरणी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दोषी धरत तानाजी सावंत यांनी जहरी टीका केली. तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे. त्याचं पावित्र्य आपण राखायला हवं. झक मारायची तर बाहेर हात लावायचा, गाभाऱ्याचे पावित्र्य कशाला भंग करतो, असे म्हणत तानाजी सावंत यांनी राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावरही सडकून टीका केली.
advertisement
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी तुळजापूर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभवाचा धक्का दिला. यानिमित्ताने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा वरचष्मा पुन्हा दिसून आला. पिंटू गंगणे यांचा ड्रग्ज प्रकरणात थेट समावेश होता. विरोधकांनी या निवडणुकीत ड्रग्जवरून भाजपवर आरोप केले. मात्र मतदारांनी गंगणे यांना साथ दिली.
