जळगाव जिल्ह्यात शिक्षक लक्ष्मीकांत पाटील हे बीएलओ म्हणून मतदान केंद्रावर कार्यरत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ते बभळाज या गावी परतत असताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात लक्ष्मीकांत पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
साताऱ्यातही अपघातात महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. निवडणूक प्रक्रियेचं काम संपवून घरी परतताना रोहित कदम या अधिकाऱ्याच्या गाडीला मध्यरात्री अडीच वाजता अपघात झाला. अपघातात रोहित कदम हे जागीच ठार झाले. दुचाकी उसाच्या ट्रॉलीला धडकून हा अपघात झाला. उडतारे इथं महामार्गावर ही दुर्घटना घडली.
advertisement
रोहित कदम यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. रोहित कदम हे जावलीतील आनेवाडी गावात ड्युटीवर होते. ते मूळचे भूईंज गावचे होते.
