निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत भाजपात प्रवेश केला. तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती. त्यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक आहे.
तेजस्वी घोसाळकर भावूक...
advertisement
तेजस्वी घोसाळकर यांनी मतदानाला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी अश्रू अनावर झाले. तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, आज अभिषेकची आठवण येत आहे. अभिषेक असता तर निवडणुकीचा आनंद वेगळा असता. अभिषेक सगळी निवडणूक हाताळायचा असे त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे म्हटले की, कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. वडीलधारे म्हणून त्यांचा आशिर्वाद आहे. पण, त्यांची राजकीय भूमिका वेगळी, माझी वेगळी आहे. अभिषेक आणि मी केलेले काम हे लोकांसमोर आहे, त्या विकास कामावर लोक मला मतदान करतील असा विश्वास त्यांनी केला.
तेजस्वी घोसाळकर कोण?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक १ मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर हे देखील नगरसेवक होते. अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह सुरू असताना फेब्रुवारी २०२४ हत्या झाली होती. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. त्यांच्या जागी काही महिन्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांची संचालक म्हणून वर्णी लागली. त्यानंतर, मागील महिन्यातच तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला.
