भारतीय टेरीटोरियल आर्मी (Territorial Army) कडून सोल्जर पदासाठी 1426 जागांसाठी वेगवेगळ्या पदांवर भरती केली जात आहे. सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर (लिपिक), सोल्जर (शेफ कम्युनिटी), सोल्जर (शेफ स्पेशल), सोल्जर (मेस कुक), सोल्जर (ER), सोल्जर (स्टुअर्ड), सोल्जर (आर्टिजन मेटलर्जी), सोल्जर (आर्टिजन वुड वर्क), सोल्जर (हेअर ड्रेसर), सोल्जर (टेलर), सोल्जर (हाऊस कीपर), सोल्जर (वॉशरमन) या पदांवर ही नोकरभरती केली जाणार आहे. सोल्जर (जनरल ड्युटी) पदासाठी 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण, सोल्जर (लिपिक) पदासाठी 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण, सोल्जर (हाऊस कीपर) पदासाठी 10वी उत्तीर्णची आवश्यकता आहे. तर इतरत्र उर्वरित पदांसाठी 08वी उत्तीर्णची आवश्यकता आहे.
advertisement
मुख्य बाब म्हणजे, ही भरती थेट केली जाणार आहे. मैदानावरच थेट इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आले आहे. 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत ही नोकरभरती केली जाणार आहे. कोल्हापूर, बेळगाव (कर्नाटक), नाशिक आणि सिकंदराबाद या चार जिल्ह्यांमध्ये ही नोकरभरती आयोजित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी नोकरभरतीची संधी मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची PDF एकदा आवश्य वाचावी. जाहिरातीच्या PDF ची लिंक इच्छुक उमेदवारांसाठी बातमीमध्ये देण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये आरक्षणाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. निवड प्रक्रियेदरम्यान आरक्षणाप्रमाणे निवड प्रक्रिया करण्याची शक्यता आहे.
1426 जागांमध्ये सोल्जर पदासाठी वेगवेगळ्या पोस्टसाठी नोकरभरती होणार आहे. किमान 15 नोव्हेंबर 2025 रोजी किमान वय 18 आणि कमाल वय 42 वर्षे पूर्ण असायला हवे. वयामध्ये कोणतीही सूट देखील देण्यात आलेली नाही. शिवाय, सर्वच अर्जदारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आलं आहे. अवघ्या काही दिवसांवरच ही भरती प्रक्रिया आलेली आहे. त्याप्रमाणे अर्जदारांनी तयारी करावी.
