TRENDING:

Thane: ठाणे हादरलं! ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाच कुटुंबातील ३ जण जखमी

Last Updated:

Thane News : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या एका ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या एका ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
Breaking news
Breaking news
advertisement

नेमकी घटना काय?

वागळे इस्टेटमधील शांतीनगर भागात 'नूतन निलम' ही ३५ वर्षे जुनी इमारत आहे. आज सकाळी या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या गजेंद्र प्रसाद यांच्या घराच्या हॉलचा स्लॅब अचानक कोसळला. हा स्लॅब थेट चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या यादव यांच्या घरात पडला. यावेळी यादव कुटुंबातील तीन सदस्य घरात असताना ते ढिगाऱ्याखाली अडकून जखमी झाले.

advertisement

बचावकार्य आणि मदत

घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इमारतीची सद्यस्थिती

इमारत ३५ वर्षे जुनी असून एकूण २६ घरे आहेत. यामध्ये एकूण ९५ व्यक्ती वास्तव्यास आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर महापालिकेच्या शाळेत इमारतीमधील सर्व रहिवाशांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

इमारतीचा इतर भागही धोकादायक ठरू शकतो, हे लक्षात घेऊन पालिकेने संपूर्ण इमारत सील केली आहे. अचानक घर सोडावे लागल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane: ठाणे हादरलं! ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाच कुटुंबातील ३ जण जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल