ठाणे : सध्या मार्केटमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. यंदा मार्केटमध्ये गणपती बाप्पाच्या शाडू मातीच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना प्रचंड मागणी आहे.
ठाण्यातील घंटाळी चौकात श्री गजानन कला केंद्र आहे. या कला केंद्रात तुम्हाला शाडू मातीच्या आणि विशेष म्हणजे कागदाच्या लगद्याच्या अनेक मूर्ती सचिन मोरे यांनी लॉकडाऊनच्या काळापासूनच या कागदाच्या लग्नाच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली होती. यावर्षी या मूर्तींना अधिकच मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
या मूर्तींमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत. यामध्ये श्रीरामाची प्रतिकृती असणारा बाप्पा, बाल गणेशा, मोरावर विराजमान असणारे बाप्पा आणि त्यासोबत वेगवेगळ्या आसनांवर विराजमान झालेले बाप्पा, अशा सगळ्या गणेशमूर्ती या कला केंद्रात उपलब्ध आहेत. यांची किंमत 600 इथे 9000 पर्यंत आहे. तुम्ही ज्या आकाराची मूर्ती घ्याल त्याचप्रमाणे यांची किंमत असेल.
अंक शास्त्रामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी मिटू शकतात?, नेमका काय आहे हा प्रकार?, VIDEO
'लॉकडाउनच्या काळातच मनात विचार आला की, सध्या पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्तींमुळे ऱ्हास होत आहे. म्हणूनच त्या वेळेपासूनच आम्ही कागदाच्या लगद्याच मूर्ती बनवायला सुरुवात केली. या मूर्ती बनवायला वेळ लागत असला तरी सुद्धा या मूर्ती उचलायला अगदी हलक्या असतात आणि विसर्जित होताना सुद्धा निसर्गाला या गोष्टीचा त्रास होत नाही. पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साजरा करण्यावर ठाणेकरांचा नेहमीच कल असतो. यावर्षी तो कल दिसून येत आहे,' असे श्री गजानन कला केंद्र येथील मूर्तिकार सचिन मोरे यांनी सांगितले.
Crispy fried Bitter melon : अशाप्रकारे बनवा कुरकुरीत फ्राय कारले, मुलंही आवडीने खातील, VIDEO
तर तुम्हालाही यंदाचा गणपती बाप्पा पर्यावरणपूरक घरी आणायचा असेल तर नक्की लाल मातीचा, शाडू मातीचा किंवा कागदाच्या लगद्याचा गणपती बाप्पा घरी आणा आणि यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करा.