अंक शास्त्रामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी मिटू शकतात?, नेमका काय आहे हा प्रकार?, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
ग्रह कोणत्या संख्येने प्रभावित होतो, यावर अवलंबून आहे. म्हणजेच ज्योतिषशास्त्रीय तथ्यांशी संख्या जुळवून एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची माहिती देणे, याला अंकशास्त्र म्हणतात. याचबाबत अंकशास्त्र तज्ञ विभा घावरे यांनी अधिक माहिती दिली.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची गणना करते. अंकशास्त्रामध्ये संख्यांची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. अंकशास्त्रात सूर्य, चंद्र, गुरू, युरेनस, बुध, शुक्र, वरुण, शनि आणि मंगळ या 9 ग्रहांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे गणना केली जाते. यातील प्रत्येक ग्रहाला 1 ते 9 अशी संख्या दिली आहे.
ग्रह कोणत्या संख्येने प्रभावित होतो, यावर अवलंबून आहे. म्हणजेच ज्योतिषशास्त्रीय तथ्यांशी संख्या जुळवून एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची माहिती देणे, याला अंकशास्त्र म्हणतात. याचबाबत अंकशास्त्र तज्ञ विभा घावरे यांनी अधिक माहिती दिली.
advertisement
अंकशास्त्रात, विशेषत: गणिताचे काही नियम वापरून, एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचे मूल्यमापन केले जाते आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल अंदाज बांधले जातात. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते.
अंकशास्त्र हे एक महत्त्वाचे प्राचीन शास्त्र आहे. याला न्यूमरोलॉजी असेही म्हणतात. याद्वारे अंकांच्या माध्यमातून व्यक्ती आणि त्याचे भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अंकशास्त्रात, गणिताचे नियम वापरून व्यक्तीचे विविध पैलू आणि विचारसरणी सांगता येते. अंकशास्त्रात सूर्य, चंद्र, गुरू, युरेनस, बुध, शुक्र, नेपच्यून, शनि आणि मंगळ या नऊ ग्रहांच्या वैशिष्ट्यांचे मूल्यांकन केले जाते.
advertisement
कसे कार्य करते अंकशास्त्र?
अंकशास्त्र हे 1 ते 9 पर्यंतच्या संख्येचे विज्ञान आहे. या 9 अंकांमध्ये सर्व ग्रह समाविष्ट आहेत. यात फक्त एक अंकी संख्या असते. त्यामुळे तुमची मूळ संख्या दोन अंकांमध्ये असेल, तर तुम्हाला ती एका अंकात रूपांतरित करावी लागते. अंकशास्त्राचाही माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार अंक आणि वास्तु शुद्धीकरणाच्या योग्य समन्वयाने व्यक्तीचे भाग्य बदलले जाऊ शकते. अंकशास्त्र व्यक्तीच्या जीवनावर तीन प्रकारे परिणाम करते. मूल्यांक, भाग्यांक आणि नाव नामांक.
advertisement
Goat Farming Tips : या 5 प्रकारच्या शेळ्या करतील मालामाल, नेमकं काय कराल?
मूल्यांक संख्या ही व्यक्तीची जन्मतारीख असते. उदा., जर तुमचा जन्म 1 किंवा 2 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूल्यांक 1 आणि 2 असेल, परंतु जर तुमचा जन्म 15 किंवा 24 तारखेला झाला असेल, तर तुमची मूल्यांक संख्या 6 असेल. कारण 1 आणि 5 ची बेरीज 6 आहे. सात 2 आणि 4 ची बेरीज देखील 6 आहे. अशाप्रकारे मूल्यांक संख्या मोजली जाते. संपूर्ण जन्मतारीख जोडून भाग्यांक काढला जातो आणि नावाचे स्पेलिंग बदलून नामांक काढला जातो. मूल्यांक आणि भाग्यांकपेक्षा ही पूर्णपणे वेगळी पद्धत असते. यासाठी अनेक असे उपाय आपण अंक शास्त्र तज्ञाकडून घेऊ शकतो.
advertisement
सूचना - ही माहिती अंकशास्त्र तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 19, 2024 1:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
अंक शास्त्रामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी मिटू शकतात?, नेमका काय आहे हा प्रकार?, VIDEO