केसर खाल्ल्यानं गोरं बाळ जन्माला येतं?, अनेकांच्या मनात वेगवेगळे गैरसमज, गर्भवती महिलांनी नेमकी काय काळजी घ्यावी?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
ही जर सर्व काळजी महिलांनी घेतलं तर त्यांचे बाळ सुदृढ जन्माला येते. त्यामुळे महिलांनी कुठल्याही गैरसमज मनात ठेवायला नाही पाहिजेत आणि कुठल्याही गोळ्या औषध हे मनाने घेऊ नये, अशी महत्त्वाची माहिती डॉ. रश्मी बोरीकर यांनी दिली.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आई होणं हे जगातील सगळ्यात मोठं सुख असतं. पण अनेक वेळा गर्भवती महिला या बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी किंवा इतरही कुठल्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतात. तसेच गर्भवती महिलांचे अनेक असे गैरसमजही असतात. त्यामुळे नक्की या गोळ्या घ्यायला हव्यात का, हे गैरसमज कसे दूर करावेत, हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील स्त्रीरोग आणि प्रस्तुतीतज्ञ डॉ. रश्मी बोरीकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, एखादी महिला जेव्हा गर्भवती राहते तेव्हा ती आजारी नसते. ती तेव्हा आई होणार असते. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक असे गैरसमज असतात. तर बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी किंवा बाळ गोरे होण्यासाठी महिला या वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतात. पण या गोळ्या घेणे अत्यंत चुकीचे आहे.
advertisement
अशा प्रकारच्या जर तुम्ही गोळ्या घेतल्या तर तुमच्या बाळाला जन्मताच व्यंग येऊ शकते किंवा त्याचा जन्मानंतर मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते. बाळ हे गोरे होणार किंवा काळ होणार हे तिच्या आई-वडिलांच्या गुणसूत्रांवरून ठरत असते. त्यामुळे तुम्ही कुठलेही उपाय करू नयेत. जसे की केसर खाल्ल्यावर बाळ गोरे होते, असे म्हणतात. पण तसे काही नाही. हे सगळे गैरसमज आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
पावसाळ्यातही होतेय केस गळण्याची समस्या, हे घरगुती उपाय करतील तुम्हाला मदत, लवकरच दिसेल फरक
जर आईने व्यवस्थित आहार घेतला आणि स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली तर बाळदेखील चांगले असते. बाळाच्या जन्माच्या वेळी बाळाचे वजन हे तीन किलो भरले पाहिजे, याची काळजी आईने घ्यायला हवी. 9 महिन्यांमध्ये गर्भवती महिलांनी कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या घ्यायला हव्यात. पण त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात. कारण बाळामध्ये कॅल्शियम आणि आयर्नची कमतरताही होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या.
advertisement
तसेच आईचे हिमोग्लोबिन आणि बीपी जर व्यवस्थित असेल तर बाळाचाही सुदृढ जन्माला येते. या 9 महिन्यांमध्ये जर आई आजारी पडली तर मनाने कुठल्याही गोळ्या या घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळ्या घ्यायला हव्यात. जर मनाने गोळ्या घेतल्या तर त्याचे वाईट परिणाम हे बाळाच्या शरीरावरती होतात आणि बाळ हे व्यंग किंवा मतिमंद जन्माला येऊ शकते.
advertisement
ही जर सर्व काळजी महिलांनी घेतलं तर त्यांचे बाळ सुदृढ जन्माला येते. त्यामुळे महिलांनी कुठल्याही गैरसमज मनात ठेवायला नाही पाहिजेत आणि कुठल्याही गोळ्या औषध हे मनाने घेऊ नये, अशी महत्त्वाची माहिती डॉ. रश्मी बोरीकर यांनी दिली.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 17, 2024 6:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
केसर खाल्ल्यानं गोरं बाळ जन्माला येतं?, अनेकांच्या मनात वेगवेगळे गैरसमज, गर्भवती महिलांनी नेमकी काय काळजी घ्यावी?