पावसाळ्यात होऊ शकतात त्वचेचे आजार, नेमकी कशी काळजी घ्यावी?, VIDEO

Last Updated:

पावसात भिजल्यावर आपल्यला अनेक त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत नाशिक येथील डॉ. चेतन राठोड यांनी महत्त्वाची माहिती दिली.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : पावसाळा हा सर्वांना आवडतो. लहान असो अथवा मोठा पावसात अनेकांना भिजायला आवडते. तसेच काही वेळा प्रवासात असतानाही व्यक्ती पावसात आले होतात. तेच कपडे दिवसभर अंगात राहतात. मात्र, पावसात भिजल्यावर आपल्यला अनेक त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत नाशिक येथील डॉ. चेतन राठोड यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शरीर हे ओले झालेले असते. अनेक वेळस पाऊस झाल्यावर वातावरण दमट होते. त्यामुळेही आपल्यला घाम येतो. शरीर हे ओलसर असते. या ओलसर शरीराने आपल्या त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. गचकरण, घामोळया, त्वचा लाल होणे, हाताचे सालटे निघणे, असे आजार अनेकांना पावसाळ्यात उद्भवत असतात.
advertisement
दिवसभर ओले कपडे घातल्याने शरीरातून घामही येतो. अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष केल्याने शरीराच्या अनेक भागात खास करून मांडीत फंगसचा (गजकर्ण) त्रास जास्त प्रमाणात होतो. मात्र, या त्रासातून आपण कसे वाचावे आणि कुठली काळजी घेणे गरजेची आहे, हे माहिती असायला हवे.
advertisement
चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार, नवीन गाड्याही दाखल होणार, नेमका काय बदल होणार?
सर्वात आधी लवकरात लवकर ओले कपडे काढावे. सर्व शरीर हे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. जितके शक्य तितके सूर्यप्रकाश घाव्या. नियमित आपले कपडे, इनरवेअर्स डेटॉलने धुऊन आणि त्याला उन्हात सुखवून शक्य झाल्यास इस्तरी करुन परिधान करावे. रोज गरम पाण्याने अंघोळ घ्यावी. आपले कपडे इतरांना आणि इतरांचे कपडे आपण घालू नये, अशी माहितीही त्यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/नाशिक/
पावसाळ्यात होऊ शकतात त्वचेचे आजार, नेमकी कशी काळजी घ्यावी?, VIDEO
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement