चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार, नवीन गाड्याही दाखल होणार, नेमका काय बदल होणार?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
सद्यस्थितीमध्ये मोनोमार्गे केवळ 8 गाड्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये 6 गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते. दर दिवशी 6 गाड्यांमार्फत 118 फेऱ्या होत आहेत. मात्र, तब्बल 18 मिनिटे गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज (सात रस्ता) या मोनो रेल्वे मार्गावरील अपडेट सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा अभियान विभागाचे निवृत्त मुख्य आयुक्त पीएस बघेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तपासणीसह एमएमआरडीए कडून मोनो मार्गिकेवर खरेदी करण्यात येत असलेल्या नव्या गाड्यांची तपासणी आणि त्यांच्या प्रमाणीकरणाची कामेही ते करणार आहेत.
advertisement
सीएमआरएस पथकाकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार सुधारणा करून उर्वरित गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. सद्यस्थितीमध्ये मोनोमार्गे केवळ 8 गाड्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये 6 गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते. दर दिवशी 6 गाड्यांमार्फत 118 फेऱ्या होत आहेत. मात्र, तब्बल 18 मिनिटे गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे प्रवाशांनी मोनो प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
advertisement
म्हणून या फेऱ्यांची वारंवारता वाढावी यासाठी एमएमआरडीए कडून आणखी दहा गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. तसेच मोनोची सिग्नलिंग यंत्रणा जुनी झाल्याने त्यात सुधारणा करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. या 10 गाड्यांमध्ये पहिली गाडी वडाळा येथील आगारामध्ये दाखल झाली आहे.
महामुंबई मेट्रो संचालन मंडळाद्वारे या गाडीची चाचणी घेतली जात आहे. त्यामध्ये या गाडीचे ऑसिलेशन तसेच सुरक्षा चाचण्यांवर भर आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यावर या मोनोमार्गिकेच्या कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांच्याकडून तपासणीही करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवले जाणार आहे. त्यानंतर ही नवी गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मोनोमार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या 250 पर्यंत पोहोचून दोन फेऱ्यांमध्ये कालावधी 5 मिनिटांवर येईल आणि प्रवाशांची सोयही व्यवस्थित होईल, असा अंदाज वर्तविला येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 17, 2024 1:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
चेंबूर ते सातरस्ता दरम्यानची मोनो सेवा सुधारणार, नवीन गाड्याही दाखल होणार, नेमका काय बदल होणार?