Crispy fried Bitter melon : अशाप्रकारे बनवा कुरकुरीत फ्राय कारले, मुलंही आवडीने खातील, VIDEO

Last Updated:

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असते.

+
कुरकुरीत

कुरकुरीत फ्राय कारले

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : कारल्याच्या भाजीचे नाव ऐकून अनेकजण नाक-तोंड गोळा करतात. त्यामुळे कारल्याची ही एक अशी रेसिपी आहे, जी मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही आवडेल. तर ही चवदार कुरकुरीत फ्राय कारल्याची रेसिपी अशाप्रकारे केल्यास त्याची चव आणखी द्विगुणित कशी होते, याबाबत दीप्ती खाडे यांनी दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असते. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात.
advertisement
रेसिपी नाव - कुरकुरीत फ्राय कारले
साहित्य -
1/2 हिरवे कारले
2 चमचे तांदळाचे पीठ
1/2 चमचा हळद
1 चमचा मसाला
चवीप्रमाणे मीठ
2 चमचे साखर चवीनुसार
तळण्यासाठी तेल
फ्राय कारले बनविण्याची कृती -
प्रथम कारले स्वच्छ धुऊन सोडण्याने सोडून घ्यावे. नंतर त्याचे स्टिक सारखे उभे तुकडे करावेत. कारल्याच्या तुकड्यांना थोडेसे मीठ लावून दहा मिनिटे ठेवून द्यावेत. 10 मिनिटानंतर ते थोडे हाताने क्रश करून स्वच्छ धुऊन घ्यावे. त्यात बिलकुल पाणी ठेवू नये. नंतर त्यात मसाला, हळद, साखर, तांदळाचे पीठ, व मीठ (मीठ-कमी प्रमाणात) घालावेत. कारण आधी त्याला मीठ लावलेले असते.
advertisement
Goat Farming Tips : या 5 प्रकारच्या शेळ्या करतील मालामाल, नेमकं काय कराल?
नंतर ते सर्व एकजीव करून घ्यावेत. तसेच गॅसवर तवा ठेवून तवा गरम झाल्यावर त्यात थोडे तेल घालून मिक्स केलेले कारले शालो फ्राय करावेत. झाकण अजिबात ठेवू नये आणि गॅस बारीक ठेवावा. अशाप्रकरे फ्राय कुरकुरीत कारले तयार झालेले असतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Crispy fried Bitter melon : अशाप्रकारे बनवा कुरकुरीत फ्राय कारले, मुलंही आवडीने खातील, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement