TRENDING:

बाप्पा येतोय, सजावटीचं काय? मुंबईकर चालवतायत खास लायब्ररी, Video

Last Updated:

श्रावण महिना आता तोंडावर आलाय. सर्वांनाच गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे, 3 ऑगस्ट : श्रावण महिना आता तोंडावर आलाय. सर्वांनाच गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. यावर्षा बाप्पासमोर आरास कशी करायची या संदर्भात घरोघरी चर्चाही सुरू झाल्या आहेत. आपण उत्साहानं ही आरास करतो. पण, गणपती विसर्जनानंतर याचं काय करायचं हा प्रश्न उभा राहतो. मुंबईतल्या शेखर बिवलकर यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलंय.
advertisement

काय आहे मखर लायब्ररी?

शेखर गेल्या तीन वर्षांपासून मखर लायब्ररी चालवत आहेत. तुम्हाला पुस्तकाची लायब्ररी माहिती असेल. त्याचप्रमाणे मखर लायब्ररी देखील चालवली जाते. तुम्ही बिवलकर यांच्याकडून एक मखर घ्यायचे या मखराचे भाडे आणि डिपॉजीट भरायचे. या मखराचे वेगळे केलेले भाग एका पिशवीत भरून तुम्हाला दिले जातात. हे भाग घरी गेल्यानंतर तुम्ही फक्त जॉइंट करायचे. त्यानंतर मखर आपल्या पद्धतीने लाईटच्या माळा सोडून सजवायचे. आपल्या बाप्पाचे विसर्जन झाले की हे मखर पुन्हा त्यांना आणून द्यायचे आणि आपले डिपॉजीट परत घेऊन जायचे अशी ही संकल्पना आहे.

advertisement

केळकर संग्रहालयामधील मस्तानी महाल पाहिला का? पाहा कोणी केला होता उभा, Video

बाप्पाचे विसर्जन होते त्यावेळी अनेक जण त्यासाठी बनवण्यात आलेली आरास ही कचरा म्हणून फेकून देतात. ते पाहून वाईट वाटते. त्यानंतरच ही संकल्पना सुचली अशी माहिती बिवलकर यांनी दिली.  ठाणेकरांनी बिवलकर यांच्या या संकल्पनेला विशेष पसंती दिली. त्यानंतर गिरगाव, बोरिवली, विरार, दहिसर, नाशिकमध्येही बिवलकरांच्या लायब्ररीमधील आरास पोहचली. इतकेच नव्हे तर इंदौर आणि बदोड्याहून देखील या मखरसाठी फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

advertisement

सध्या बिवलकर यांच्याकडे वेगवेगळ्या आकारातल्या 40 मखर आहेत. यावर्षी मखरची संख्या वाढली तर वेगळी जागा घेऊन त्याचा वर्षभर व्यवस्थित सांभाळ करु असे बिवलकर यांनी सांगितलं. त्याचबरोबर या वर्षीसाठीही नवीन मखर बनवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

उच्च शिक्षण घेऊनही नोकरी नाही, दोन भावंडांनी सुरू केला दूध व्यवसाय, आता लाखोंची कमाई

advertisement

या वस्तूंनी सजवलं मखर

या मखरांमध्ये पूर्णतः एमडीएफ (प्लायचा एक प्रकार) वापरले असून टाकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीने हे मखर सजवण्यात आले आहे. यासाठी पुठ्ठा, मोती, मणी , बांगड्या, लेस, वेलवेटचे कापड, सॅटिनचे कापड , कापड आणि फूड फॉइल पासून तयार केलेली फुले या गोष्टींचा वापर केल्याची माहिती बिवलकरांनी दिली.

advertisement

कुटुंब रंगले आरासमध्ये

विशेष म्हणजे शेखर यांचा दिवंगत भाऊ राजेंद्र बिवलकर यांनी त्यांना साथ दिली. तीन वर्षांपूर्वी त्यांनी काही मखर स्वतः बनवले होते ते आजही जसेच्या तसे आहेत. अपर्णा बिवलकर यांच्या इंजिनियर असलेल्या वहिनी अनुश्री आपटे या स्वतः वेलवेटचे कापड शिवतात. अपर्णा स्वतः एक शास्त्रीय गायिका असून शेखर बिवलकर देखील एका खासगी कंपनीत काम करतात. मात्र असे असले तरी पर्यावरण आणि कलेची सांगड घालत हे सारेच कुटुंब बाप्पाच्या आरास सेवेमध्ये रंगले आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
बाप्पा येतोय, सजावटीचं काय? मुंबईकर चालवतायत खास लायब्ररी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल