उच्च शिक्षण घेऊनही नोकरी नाही मिळाली, दोन भावंडांनी सुरू केला दूध व्यवसाय, आता लाखोंची कमाई
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
उच्च शिक्षण घेतलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन भावंडांनी दूध व्यवसाय करत स्वतःची प्रगती केली आहे.
छत्रपती संभाजीनगर, 2 ऑगस्ट : उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यानं अनेक तरुण हे व्यवसायाच्या शोधात असतात. अशाच उच्च शिक्षण घेतलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन भावंडांनी दूध व्यवसाय करत स्वतःची प्रगती केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या पाचोड येथील उमेश नरवडे आणि गणेश नरवडे असे या दोन भावंडांची नावे आहेत. या दोघांही भावंडांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्यानं स्वतःचं दुधाचा व्यवसाय सुरु केला. ज्या व्यवसायातून ते आज नोकरदारापेक्षाही जास्त पैसे कमवत आहेत.
कशी झाली सुरुवात?
उमेश याचे बीए, बीएससीचं शिक्षण झालंय तर गणेश नरवडे याचं बीए पर्यंत शिक्षण झालंय आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नसल्याने 2018 साली उमेश नरवडे आणि गणेश नरवडे या भावंडांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी दोन म्हशी घेतल्या होत्या, त्यातून 30 ते 40 लिटर दुधाची विक्री ते करु लागले. दुधाच्या व्यवसायामध्ये चांगले पैसे मिळू शकतात असे त्यांना वाटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हशी बरोबरच त्यांनी गाई देखील विकत घेतल्या. सध्या त्याच्याकडे म्हशी आणि गाई मिळून एकूण 40 जनावरं आहेत.
advertisement
कसं करतात चारा व्यवस्थापन?
दूध वाढीसाठी या जनावरांना हिरवा चारा, गोळी पेंड त्याचबरोबर मका यासारखा खुराक या दुभत्या जनावरांना दिवसातून दोन वेळा दिला जातो. नरवडे बंधुकडे 12 एकर जमून असून त्यातील 5 एकारावर जनावरांसाठी हिरवा चारा आहे. त्यामुळे जनावरांना बाराही महिने चारा उपलब्ध होतो. हा व्यवसाय वाढवण्यासाठी दोघेही भावंड वेळ मिळेल तसा या मुक्त गोठ्यात काम करत असतात.
advertisement
किती होतीय कमाई
दररोज गाईचे 30 लिटर तर म्हशीचे 130 लिटर दुध निघते. या दुधाची विक्री ते जवळच असलेल्या एका डेरीवर करत आहेत. सध्या गाईच्या दुधाला 35 रुपये लिटरचा भाव मिळत आहे. तर म्हशीच्या दुधाला 65 ते 70 रुपये लिटरचा भाव मिळतोय. या दुधातून महिन्याला मजूर, जनावरांचा चारा आणि त्यांच्या देखरेखीचा खर्च वगळता महिन्याकाठी 90 हजार ते 1 लाख रुपये या व्यवसायातून मिळवत आहेत, असं उमेश नरवडे यांनी सांगितले.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 02, 2023 7:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
उच्च शिक्षण घेऊनही नोकरी नाही मिळाली, दोन भावंडांनी सुरू केला दूध व्यवसाय, आता लाखोंची कमाई