केळकर संग्रहालयामधील मस्तानी महाल पाहिला का? पाहा कोणी केला होता उभा Video

Last Updated:

पुणे शहरामध्ये अनेक पेशवे कालीन वास्तू आहेत. त्यापैकीच एक मस्तानी महाल आहे.

+
News18

News18

पुणे, 2 ऑगस्ट : पुणे शहरामध्ये अनेक पेशवे कालीन वास्तू आहेत. ज्याद्वारे पेशवे काळातील जीवनशैलीचे दर्शन घडते. तसेच त्या काळातील वास्तू कलेचा एक आदर्श नमुना म्हणून बाजीरावाने मस्तानीसाठी शनिवारवाड्याला लागूनच असा आलिशान महाल बनविला होता. बाजीराव पेशवा पहिला आणि मस्तानीच्या प्रेमकथेचा मराठा इतिहासातील सर्वात रंजक प्रेमकथा म्‍हणून बाजीराव मस्तानीचा उल्‍लेख होतो.
ऐतिहासिक शनिवारवाडा हा बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचा साक्षीदार आहे. पण मस्तानीला शेवटपर्यंत शनिवारवाड्यात प्रवेश मिळाला नाही. बाजीरावाने मस्तानीसाठी शनिवारवाड्याच्या बाजूलाच मस्तानी महाल बनविला होता पण हा महाल शनिवारवाड्यात लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्या जळालेल्या महालाचे काही अवशेष कोथरुड येथे ठेवण्यात आले होते, त्यातील काही आत्ता शिल्लक असून ते पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयात पहावयास मिळतात. आम्ही तुम्हाला त्याच महालाविषयी सांगणार आहोत.
advertisement
इतिहासाची आठवण करून देणारा मस्तानी महाल
राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये पुनर्स्थापित मस्तानी महाल हा मूलतः थोरले बाजीराव पेशवे यांनी 1730 मध्ये 1734 दरम्यान पुण्यातील कर्वे रोड जवळ कोथरूड येथे मस्तानी साहेबांसाठी उभा केला. तेथून 1960 च्या दशकात संग्रहालयाचे संस्थापक काकासाहेब केळकर यांनी तेथून हा महाल शुक्रवार पेठमध्ये कुशल कारागिरांच्या साह्याने जसाच्या तसा उभा केला. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला आणि इतिहासाची आठवण करून देणारा हा मस्तानी महाल भेट देणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांसाठी निश्चितच आकर्षणाचे केंद्र बनला आहे, असं राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी सांगितले. 
advertisement
आगीत जळून नष्ट झाला होता महाल
मस्तानीचा आलिशान महाल हा एका भीषण आगीत जळून खाक झाला होता. त्याचे जळालेले अवशेष आजही आपल्याला केळकर संग्रहालयात पहायला मिळतात. महालात असलेले आरसे, बाजीरावांची शस्त्रे, वस्त्रे आणि महालाचे जळालेले अवशेष हे आजही बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत, असंही सुधन्वा रानडे यांनी सांगितले. 
advertisement
कुठे आहे मस्तानी महाल?
कमलकुंज, बाजीराव रोड, नातू बाग, शुक्रवार पेठ, पुणे, महाराष्ट्र 
मराठी बातम्या/पुणे/
केळकर संग्रहालयामधील मस्तानी महाल पाहिला का? पाहा कोणी केला होता उभा Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement