ठाणे : आता सध्या जून महिना सुरू झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वच जण निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या जागा शोधत असतात. अनेकजण अशा ट्रिपही काढत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास जागेबाबत सांगणार आहोत. मुंबईतील या सर्व धावपळीच्या आणि गोंगाटाच्या जीवनशैलीत ठाण्याच्या मध्यवर्ती भागात अशीच एक जागा आहे. याठिकाणी रोज सकाळ-संध्याकाळ आणि खास करुन पावसाळ्यात फिरण्यासाठी लोकं येत असतात.
advertisement
काय आहे या तलावाचे वैशिष्टय?
ठाण्याच्या पाचपाखाडी येथे हा तलाव आहे. कचराळी तलाव असे या तलावाचे नाव आहे. हा ठाण्यातील प्राचीन आणि प्रसिद्ध तलाव आहे. खरंतर हा कचराळी तलाव मांजरींकरिता प्रसिद्ध आहे. इथे हजारोंच्या संख्येने मांजरी आढळतात. प्राणीप्रेमी, मित्र कायमच इथे भेट देत असतात. यासोबतच पावसाळ्यातही कचराळी तलावाच्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक येतात.
मराठीत स्टँडअप poetry रुजवणारा अपूर्व बनला तरुणाईच्या गळ्यातील ताईत, कोण आहे हा तरुण?
तलावाच्या बाजूला गणपती बाप्पाचे सुंदर मंदिर -
याठिकाणी गणपती बाप्पाचे एक छोटेसे मंदिरही आहे. येथे रोज सकाळी-संध्याकाळी आरती होते. त्यामुळे अनेक भाविकही येतात. या मंदिरामुळे तलावाच्या आजूबाजूचा परिसर प्रसन्न वाटतो.
कचराळी तलाव असणाऱ्या या ठिकाणी आजूबाजूला कोणतेच गार्डन किंवा इतर गोष्टी नसल्यामुळे पाऊस पडून गेल्यानंतर झालेले थंड वातावरण अनुभवण्यासाठी ठाणेकर कचराळी तलावालाच येतात आणि थंड, निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेतात. तुम्हालाही जर ठाण्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर आवर्जून या ठाणे पश्चिम मधल्या कचराळी तलावाला भेट द्या.
पावसाळ्यात ताडपत्रीची चिंता, याठिकाणी मिळणार दर्जेदार उत्पादन, जाणून घ्या, दर अन् ठिकाण
पर्यटकांनी दिली ही प्रतिक्रिया -
'मी गेली अनेक वर्ष कचराळी तलावात रोज संध्याकाळी राउंड मारण्यासाठी येत असतो. आम्हा वृद्धांसाठी ही हक्काची जागा आहे. यासोबतच इथे अनेक जॉगिंग करणारे, व्यायाम करणारे लोकं, गार्डनमध्ये खेळणारी लहान मुले येत असतात. पाऊस पडून गेल्यानंतर तर इथलं वातावरण आणखीनच प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतं,' असे तिथे रोज येणाऱ्या दिलीप चव्हाण यांनी सांगितले.





