पावसाळ्यात ताडपत्रीची चिंता, याठिकाणी मिळणार दर्जेदार उत्पादन, जाणून घ्या, दर अन् ठिकाण
- Published by:News18 Marathi
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनीही आता ताडपत्री खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी केली आहे. सध्याला ताडपत्रीचे भाव काय आहेत, कोणकोणते प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत, याबाबत येथील व्यापाऱ्यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिली.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाला की, अनेकप्रकारचा सामाना सर्वजण ताडपत्री ही खरेदी करतात. बाजारात मोठ्या प्रमाणात ताडपत्री खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येते. मात्र, काही वेळा लोकांना चांगल्याप्रकारची ताडपत्री न मिळाल्याने भ्रमनिरासही होतो. त्यामुळे लोकल18 च्या टीमने याबाबत विशेष आढावा घेतला.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनीही आता ताडपत्री खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी केली आहे. सध्याला ताडपत्रीचे भाव काय आहेत, कोणकोणते प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत, याबाबत येथील व्यापाऱ्यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिली.
advertisement
मुलाने सांभाळण्यास दिला नकार, 70 वर्षीय आईला सोडलं बेवारस, पोलिसांना माहिती झालं आणि...
पावसाळा सुरू झाला की शेतकरी आणि नागरिक हे आपल्या विविध सामान झाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात ताडपत्री खरेदी करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात होलसेल आणि रिटेल दरामध्ये ताडपत्री ही उपलब्ध आहे. ताडपत्री घरावर झाकण्यासाठी, त्याचबरोबर चारा झाकण्यासाठी किंवा नर्सरीसाठी, त्यासोबतच इतरही वेगवेगळ्या गोष्टींसाठी खरेदी केली जाते. तसेच जे शेतकरी शेततळे तयार करतात तेदेखील याच ठिकाणावरून ताडपत्री खरेदी करून घेऊन जातात. शहरातील या शहागंज भागात ताडपत्री खात्री करण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून येते.
advertisement
येथील व्यापारी सांगतात की, सध्याला ताडपत्रीचे भाव वाढलेले आहेत आणि सध्या सीजन हा थोडा कमी होत आहे पण तरी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. पण याच्यापेक्षा अजून गर्दी नागरिकांची असते. आता अजुन थोडा पाऊस पडल्यानंतर नागरिकांची गर्दी होईल, असे ते म्हणाले.
दररोज लावत आहात टिळा, तर या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा दिवसभरातील पुण्य होणार नष्ट
याठिकाणी विविध ताडपत्रीचे प्रकारही उपलब्ध आहेत. तुम्हाला येथे 50 रुपये मीटर ते 70 रुपये मीटरपर्यंत ताडपत्री मिळेल. तर रेग्युलर ताडपत्री 50 ते 60 रुपये मीटर या दराने याठिकाणी उपलब्ध आहे. तसेच याच्यापेक्षा चांगली ताडपत्री हवी असेल तर 70 रुपये मीटरने उपलब्ध आहे. स्क्वेअर फुटनुसारदेखील ताडपत्री उपलब्ध आहे. यामध्ये दोन रुपये, अडीच रुपये, तीन-साडेतीन रुपये, चार रुपये अशा स्क्वेअर फुट दराने याठिकाणी ताडपत्री उपलब्ध आहे. रेडिमेट ताडपत्रीही इथे उपलब्ध आहे. ती सहसा ट्रक साठी वापरण्यात येते. त्यामध्ये पण भरपूर आहेत.
advertisement
अनेक शेतकरी आणि सामान्य नागरिक ताडपत्रीची खरेदी करत आहेत. तुम्हालाही जर ताडपत्री विकत घ्यायची असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज परिसरामध्ये जाऊन खरेदी करू शकता.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 18, 2024 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पावसाळ्यात ताडपत्रीची चिंता, याठिकाणी मिळणार दर्जेदार उत्पादन, जाणून घ्या, दर अन् ठिकाण