TRENDING:

काळा घोडा कला महोत्सवाच्या निधी संकलनासाठी राहुल देशपांडे यांच्या मैफिलीचे आयोजन, कधी होणार कार्यक्रम?

Last Updated:

ही मैफिल काळा घोडा कला महोत्सवाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण जीर्णोद्धार प्रकल्पांना निधी देण्यासाठी, तसेच दक्षिण मुंबई परिसराच्या सांस्कृतिक ठेव्याचे रक्षण करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात करण्यात आलेली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
राहुल देशपांडे (फाईल फोटो)
राहुल देशपांडे (फाईल फोटो)
advertisement

मुंबई : काळा घोडा कला महोत्सवाच्या निधी संकलनासाठी प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. काळा घोडा असोसिएशन, छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कधी होणार कार्यक्रम -

रौप्यमहोत्सवी काळा घोडा कला महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय (CSMVS) आणि नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) च्या सहकार्याने राहुल देशपांडे कलेक्टिव्ह नावाने एक कर्टन रेझर चॅरिटी फंडरेझर कॉन्सर्ट सादर केला जाणार आहे. रविवार, 29 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता जमशेद भाभा थिएटर, NCPA येथे या मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

advertisement

ही मैफिल काळा घोडा कला महोत्सवाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण जीर्णोद्धार प्रकल्पांना निधी देण्यासाठी, तसेच दक्षिण मुंबई परिसराच्या सांस्कृतिक ठेव्याचे रक्षण करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात करण्यात आलेली आहे.

जायकवाडी धरण 87 टक्के भरले, पूर क्षेत्रातील या गावांना पोलिसांनी दिला महत्त्वाचा इशारा

या कार्यक्रमाविषयी सांगताना, काळा घोडा असोसिएशनच्या अध्यक्षा आणि महोत्सव संचालक वृंदा मिलर म्हणाल्या, "काळा घोडा कला महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी पर्वाला सुरुवात करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कला, कलाकार आणि जनतेने एकत्रितरित्या उत्सव साजरा करण्याचा हा प्रवास बघता बघता 25 वर्षांचा झाला. हा प्रवास पुढे सुरू ठेवताना आम्ही खूप आनंदी आहोत.

advertisement

यानिमित्ताने प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचा कलेक्टिव्ह कॉन्सर्ट आम्ही आयोजित केला आहे. या मैफिलीचे उद्दिष्ट्य काळा घोडा कला महोत्सवाच्या संस्कृतीसाठी निधी गोळा करण्याचे आहे. आमचे सहयोगी, संरक्षक आणि प्रेक्षकांच्या अतुलनीय पाठिंब्यामुळेच आम्ही हा अनोखा खजिना जतन करीत आहोत, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबईत ढोल पथकाच्या टीमचं कौतुकास्पद कार्य, पथनाट्याच्या माध्यमातून करताय जनजागृती, काय आहे विषय?

advertisement

राहुल देशपांडे हे भारतातील प्रख्यात, लोकप्रिय शास्त्रीय संगीत गायक आहे. पुण्यात राहणारे राहुल देशपांडे पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध दिवंगत डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत. राहुल देशपांडे कलेक्टिव्ह, हा एक संगीतमय कार्यक्रम असून तो प्रेक्षकांना एका अनोखा अनुभव देणारा आहे. या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा आणि समृद्धतेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन द इव्हेंट कंपनी आणि जिंजर पीआर करत आहेत.

advertisement

यावर्षी, आम्ही CSMVS प्राचीन जागतिक गॅलरी प्रकल्प देखील साजरा करत आहोत, CSMVS संग्रहालयातील "प्राचीन शिल्पे" नावाच्या प्रदर्शनाचा समारोप राहुल देशपांडे यांच्या या मैफिलीने केला जात आहे, असेही सांगण्यात आले आहे.

कधी होणार काळा घोडा कला महोत्सव -

आशियातील सर्वात मोठा बहुविद्याशाखीय स्ट्रीट आर्ट्स फेस्टिव्हल, आयकॉनिक काळा घोडा कला महोत्सव (KGAF) ला कलात्मक उत्कृष्टता, सांस्कृतिक उत्सव आणि सामुदायिक सहभागाचा रौप्यमहोत्सव साजरा करणार आहें. 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत या रौप्यमहोत्सवी काळा घोडा कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नेहमीप्रमाणेच यावेळीही कला प्रेमींना सर्जनशीलता, नावीन्य आणि सर्वसमावेशकतेचे प्रदर्शन घडवले जाणार आहे.

दक्षिण मुंबईच्या काळा घोडा घोडा परिसरासह आजूबाजूच्या परिसरातही आयोजित या महोत्सवाचा उद्देश्य सर्वांसाठी कलांचा प्रचार, जतन आणि प्रसार करणे हा आहे. 1999 मध्ये स्थानिक कार्यक्रम म्हणून काळा घोडा कला महोत्सवाला अत्यंत छोटेखानी स्वरुपात सुरुवात झाली होती आज हा महोत्सव देशातील एक महत्वाचा आणि जास्त काळ चालणारा उत्सव बनला आहे. या कला महोत्सवात मुंबई आणि आसपासच्या लाखों कला प्रेमींनी आजवर भेट दिली असून कला प्रेमी प्रत्येक वर्षी या कला महोत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतात.

14 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 300 पेक्षा अधिक कार्यक्रमांसह यंदाच्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या 24 वर्षांपासून हा महोत्सव सुरू असून आता रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. यंदाच्या महोत्सवात व्हिज्युअल आर्ट्स, नृत्य, संगीत, थिएटर, साहित्य, सिनेमा, हेरिटेज वॉक, शहरी रचना आणि वास्तुकला, स्टँड अप, वेगवेगळे खाद्य पदार्था इत्यादींचा समावेश आहे.

राहुल देशपांडेंच्या मैफिलीची तिकिटे खरेदी करण्यासाठी, तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता :

https://in.bookmyshow.com/events/rahul-deshpande-collective/ET00409246

वेबसाइट : www.kalaghodaassociation.com

फेसबुक : https://www.facebook.com/kalaghodaartsfestival

ट्विटर: https://twitter.com/kgafest

इंस्टाग्राम: https://www.instagram.com/kgafest

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
काळा घोडा कला महोत्सवाच्या निधी संकलनासाठी राहुल देशपांडे यांच्या मैफिलीचे आयोजन, कधी होणार कार्यक्रम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल