TRENDING:

Dombivli: डोंबिवलीच्या लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागाच नाही! नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Dombivli: महिलांच्या डब्यामध्ये तर काही वेळा उभं राहण्यासाठी देखील जागा मिळत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली: ठाणे आणि कल्याण दरम्यान असणाऱ्या डोंबिवली उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. या ठिकाणाहून नोकरीसाठी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील फार जास्त आहे. लोकल ट्रेन हे डोंबिवलीकरांच्या प्रवासाचं प्रमुख माध्यम आहे. मात्र, डोंबिवलीतून सुटणाऱ्या लोकलमध्ये स्थानिकांना उभं राहण्यासाठी देखील जागा मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
Dombivli: डोंबिवलीच्या लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागाच नाही! नेमकं प्रकरण काय?
Dombivli: डोंबिवलीच्या लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागाच नाही! नेमकं प्रकरण काय?
advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतून सकाळी 8 वाजून 14 मिनिटांनी एक लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाते. ही लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेच्या अर्धा तास अगोदर पोहचते. त्यामुळे बहुतांशी नोकरदार याच लोकलला पसंती देतात. शिवाय, कर्जत, कसारा, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा भागातून प्रवाशांनी खचाखच भरून येणाऱ्या लोकलने प्रवास करण्यापेक्षा डोंबिवलीतून सुटणारी लोकल योग्य वाटते. मात्र, या लोकलमध्ये डोंबिवलीकरणांना उभं राहण्यासाठी देखील जागा मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

advertisement

Mumbai Metro: अंधेरी-दहिसर मेट्रो प्रवाशांच्या प्रतिक्षेत! अपेक्षित टप्पा पूर्ण करण्यासाठी तब्बल 6 लाख प्रवाशांची गरज

डोंबिवलीतून सकाळी 8 वाजून 14 मिनिटांनी सुटणारी लोकल अगोदर सीएसएमटीकडून डोंबिवलीत येते. याचा फायदा घेत मुंब्रा, दिवा, कोपर भागातील प्रवासी उलट मार्गे प्रवास करत डोंबिवलीत येतात आणि सीट पकडून ठेवतात. हे प्रवासी अगोदरच सीटवर बसून येत असल्याने डोंबिवली रेल्वे स्टेशनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही.

advertisement

लोकल डब्यांमध्ये तीन डबे महिलांसाठी राखीव असतात. महिलांच्या डब्यामध्ये तर काही वेळा उभं राहण्यासाठी देखील जागा मिळत नाही. कारण, गेल्या काही महिन्यांपासून हे तिन्ही डबे मुंब्रा ते कोपर भागातील रेल्वे स्टेशनमधील महिला प्रवाशांनी भरलेले असतात, अशा तक्रारी डोंबिवलीतील नोकरदार महिला प्रवाशांनी केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने यावर काही उपाययोजना कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Dombivli: डोंबिवलीच्या लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागाच नाही! नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल