TRENDING:

नवरात्रीत वापरा प्युअर खादीच्या साड्या, ठाण्यातील हे लोकेशन आहे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन

Last Updated:

pure khadi sarees in thane - ऑफिसमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसून जाताना बऱ्याच जणी या साड्यांना महत्त्व देतात. त्यामुळे तुम्हीही प्युअर खादीच्या साडीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

ठाणे - नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यामुळे बाजारात सर्वत्र उत्साह जाणवत आहे. नवरात्रीमध्ये महिला या प्रत्येक दिवशी विविध रंगांच्या साड्या नेसण्याला प्राधान्य देतात. ऑफिसमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसून जाताना बऱ्याच जणी या साड्यांना महत्त्व देतात. त्यामुळे तुम्हीही प्युअर खादीच्या साडीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

ठाण्यातील कॉटन बाजार या साडीच्या दुकानात नवनवीन खादीच्या साड्या उपलब्ध झाल्या आहेत. या खादीच्या साडीमध्ये गरम तर होत नाहीच आणि कम्फर्टेबल सुद्धा वाटते. याठिकाणी या साडीची किंमत फक्त 6000 रुपयांपासून सुरू होते.

advertisement

कोणते प्रकार उपलब्ध -

ठाण्यातील नौपाडा येथे असलेले कॉटन बाझार हे दुकान खादीच्या साड्यांसाठी खूप प्रसिध्द आहेत. इथे असणाऱ्या सगळया खादीच्या साडी हातकाम करून सजवलेल्या आहेत. या खादीच्या साड्यांमध्ये खादी तसर, बनारस खादी, चापा खादी आणि इतरही अनेक प्रकार आहेत. या साड्यांमधे यावर केलेले हॅण्ड वर्क लक्ष वेधून घेते. जग्गनाथ पुरीची स्पेशलिटी असणारे मंदिर सुद्धा खादीच्या साडीच्या पदरावर कोरलेले आहे.

advertisement

एकेकाळी होता हॉटेल कामगार, आज झाला हॉटेल मालक, दिवसाला 2 हजारांचा नफा, जालन्यातील व्यक्तीच्या जिद्दीची कहाणी!

'आमच्याकडे मिळणाऱ्या साड्या या सगळया हातकाम करुन सजवलेल्या आहेत. इतर ठिकाणांपेक्षा आमच्या इथे या साड्यांची किंमत कमी आहे. खादीच्या साडीचे वैशिष्टय म्हणजे आमच्याकडे तुम्हाला ज्या राज्याची वैशिष्टये असणारी साडी हवी आहे, ती साडी मिळेल,' असे कॉटन बाजार मधील हिरामण यांनी सांगितले.

advertisement

तर मग तुम्हालाही यंदाच्या नवरात्रीत खादीच्या साड्या नेसून पारंपारिक आणि प्रोफेशनल लूक करायचा असेल, तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
नवरात्रीत वापरा प्युअर खादीच्या साड्या, ठाण्यातील हे लोकेशन आहे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल