ठाणे : सध्या सगळ्यांनाच पिझ्झा, बर्गर, मोमोज, सँडविच अशा गोष्टी प्रचंड आवडतात. कल्याणमध्येही असे एक ठिकाण आहे जिथे मिळणारे पदार्थ कल्याणकरांचे आवडीचे आहेत. कल्याण स्थानकापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या खडकपाडा येथे मंच अँड ब्रंच नावाचे कॅफे आणि रेस्टॉरंट आहे. या मंच अँड ब्रंचमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि लंचच्या वेळी खाल्ले जाणारे पदार्थ खायला मिळतील.
advertisement
त्यांच्या इथे मिळणारे पिझ्झाचे प्रकार हे मंच अँड ब्रंचच वैशिष्ट्य आहे. या रेस्टॉरंटमधला पिझ्झा हा पदार्थ प्रचंड फेमस आहे. पिझ्झामध्ये यांच्याकडे क्लासिक मार्गे रिटा, गोल्डन डिलाईट, मेक्सिकन फ्युजन, मश्रुम अलाईव्ह पिझ्झा, थ्री चीज पिझ्झा, चिकन ओव्हरलोड पिझ्झा, फाईव्ह जी पिझ्झा असे दहाहून अधिक प्रकार इथे मिळतात आणि यांची किंमतही फक्त 180 रुपयांपासून सुरू होते.
कल्याणकरांना त्यांचे हे पिझ्झा वरायटीज सध्या खूप आवडत आहेत. इथे फास्ट फूडमध्ये मिळणाऱ्या सँडविचमध्येही खूप प्रकार आहेत. क्लासिक सँडविच ग्रिल, चीज सँडविच ग्रिल, इटालियनची सँडविच ग्रील, देसी पनीर तंदुरी सँडविच ग्रील, चिकन कबाब सँडविच, पेरी पेरी चिकन सँडविच या सगळ्या प्रकारचे सँडविच मिळतात. यांची किंमत तर फक्त 120 रुपयांपासून सुरू होते.
कॉलेजच्या मुलांना आणि एकूणच तरुणाईला जे जे पदार्थ आवडतात ते इथे मिळतात. मंच अँड ब्रँच या रेस्टॉरंटची आणखी एक खासियत म्हणजे इथे मिळणारा पनीर टिक्का केपसा आणि चिकन टिक्का केपसा. यांची किंमत 600 रुपये आहे. इतर ठिकाणी याची किंमत 750 ते 800 रुपये असते.
दादरमध्ये याठिकाणी मिळतं अगदी घरगुती जेवण, शुद्ध तुपातले मोदक अन् पुरणपोळीची चवही चाखता येणार!
ऋचा मोजाड आणि नमिता गायकर या 2 तरुणींनी मिळून हे मंच अँड ब्रँच नावाचे रेस्टॉरंट कल्याणमध्ये सुरू केले. नमिताचे शिक्षण मायक्रोबायोलॉजीमध्ये झाले असून ऋचासुद्धा उच्चशिक्षित आहे. दोघींनाही व्यवसाय करण्याची आवड असल्याने जॉब सोडून दोघीही आता आपल्या नव्या व्यवसायाकडे लक्ष देत आहेत. ऋचा आणि नमिता या दोघी नात्याने एकमेकींच्या नणंद-भावजय असून त्या दोघींचे पतीही त्यात दोघींना या पूर्ण प्रवासात मदत करत आहेत.
4 हजार जमवले अन् आठवडी बाजार गाठला, 10 रुपयांची वस्तू विकून आता महिन्याला 75 हजारांची उलाढाल
'स्वतःचे रेस्टॉरंट असावं असा ऋचाचा आणि माझा विचार अनेक वर्ष होता. मात्र, जॉब सांभाळून इतका मोठा व्यवसाय सांभाळणं जमत नव्हतं. म्हणून मग आम्ही आमचा जॉब सोडून आता संपूर्ण लक्ष या आमच्या रेस्टॉरंटमध्ये घातले आहे. आमच्या इथे तरुणाईला आवडतील, असे सगळे पदार्थ अगदी स्वस्तात मिळतात,' असे रेस्टॉरंटच्या मालक नमिता गायकर यांनी सांगितले.
या रेस्टॉरंटचे वातावरण सुद्धा अगदी शांत आणि रिफ्रेशिंग आहे. तर तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा आणि सँडविचचे प्रकार ट्राय करायचे असतील, खेपसाची टेस्ट घ्यायची असेल तर कल्याणमधील खडकपाड्यातील या मंच अँड ब्रंच रेस्टॉरंटला नक्की भेट द्या.