TRENDING:

गोकुळाष्टमीला हवेत सुंदर दागिने, ठाण्यातील या मार्केटमध्ये मिळतील, तेही स्वस्त दरात, VIDEO

Last Updated:

गोकुळाष्टमीला अनेक मुले आणि मुली श्रीकृष्ण आणि राधाचा लूक करतात. त्या कपड्यांवर राहण्यासाठी त्या कपड्यांवर मॅचिंग दागिने या मार्केटमध्ये मिळतात. याठिकाणी याची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

ठाणे : सध्या ठाणे मार्केटमध्ये गोकुळाष्टमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ठाणे मार्केटमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत, जिथे गोकुळाष्टमीच्या वस्तू मिळतात. ठाणे स्टेशन पासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या विठ्ठल मंदिर गल्ली मार्केटमध्ये फक्त 50 रुपयांपासून गोकुळाष्टमीच्या दिवशी लागणारे दागिने मिळतात.

गोकुळाष्टमीला अनेक मुले आणि मुली श्रीकृष्ण आणि राधाचा लूक करतात. त्या कपड्यांवर राहण्यासाठी त्या कपड्यांवर मॅचिंग दागिने या मार्केटमध्ये मिळतात. याठिकाणी याची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते. येथील मार्केटमधील गजानन पूजा भांडार या दुकानात तुम्हाला कृष्णाचा लूक करण्यासाठी लागणारे सगळे दागिने मिळतील. या दागिन्यांमध्ये कंबरपट्टा, मोरपीस असणारे मुकुट, बाजूबंद, बासरी या सगळ्या गोष्टी फक्त दीडशे रुपयांना मिळतील.

advertisement

सोलापूर बाजार समितीत 192 ट्रक कांदा आवक, जुना कांदा खातोय भाव, इतका आहे दर

तुम्हाला जर तुमच्या चिमुकल्यांचा लुक सुद्धा सुंदर करायचा असेल तर त्यांना लागणारे बाजूबंद, सुंदर मुकुट सुद्धा इथे फक्त 50 रुपयांना मिळतात. राधाचा लूक करण्यासाठी लागणारे दागिने सुद्धा इथे उपलब्ध आहेत. अनेक जण गोकुळाष्टमीच्या दिवशी त्यांच्या देव्हाऱ्यात असणाऱ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा सजवतात.

advertisement

दोनदा अपयश, पण शेवटी मैदान मारलंच!, ‘ब्यूटी विथ ब्रेन’ असलेल्या आयपीएस अधिकारी आशना चौधरी, PHOTOS

तुम्हीही श्रीकृष्णाच्या मूर्तीला सजवत असाल तर सुंदर बासरी, मुकुट या सगळ्या गोष्टी फक्त पन्नास रुपयांपासून मिळतील. तर मग मंडळी वाट कसली पाहताय, तुम्हालाही राधा कृष्णाचा सुंदर लुक करायचा असेल तर ठाणे मार्केटमधील याठिकाणी येऊन नक्की स्वस्तात मस्त अशी खरेदी करू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
गोकुळाष्टमीला हवेत सुंदर दागिने, ठाण्यातील या मार्केटमध्ये मिळतील, तेही स्वस्त दरात, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल