प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती; नवरात्रीनिमित्ताने कार्ला परिसरात वाहतुकीत बदल
नवरात्र उत्सवानिमित्त 22 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर रोजी शहरातून शक्ती देवीची मिरवणूक काढली जाते. तर काही मंडळाची मिरवणूक राष्ट्रीय महामार्गावरून निघते. तसेच बाळवेस चौक, टिळक चौक, मधला मारुतीचौक, कोतम चौक, माणिक चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकी या परिसरात साहित्य खरेदी करण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुक कोंडीची शक्यता असल्याने 22 सप्टेंबर सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक 2 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
एसटी महामंडळामध्ये मेगाभरती, 17450 पदांसाठी भरती होणार
नवरात्र उत्सवानिमित्त बाळवेस चौक, टिळक चौक, मधला मारुतीचौक, कोतम चौक, माणिक चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकी परिसरात पूजेसाठी तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी असते म्हणून 22 सप्टेंबर सकाळी सहा वाजल्यापासून ते दोन ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.तसेच पोलीस खात्याची वाहने अत्यावश्यक सेवेची व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील त्याच वाहनांना या मार्गावरून वाहने नेण्यास परवानगी असणार आहे.बाळीवेस ,बीएसएनएल ऑफिस, मंगळवार पेठ पोलीस चौकी ते कुंभार बेस्ट मार्गे कोणतं चौक व पुढे समाचार चौक मार्गे माणिक चौक हा पर्यायी मार्ग असेल.आदेशाचा भंग केल्यास त्या व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वय गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.