ST Bus Recruitment : एसटी महामंडळाची मोठी घोषणा! 17450 पदांसाठी भरती होणार, पगार किती मिळणार? A TO Z माहिती

Last Updated:

ST Bus Recruitment : राज्यातील हजारो बेरोजगार तरूण- तरूणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नोकरभरतीची करण्यात येणार आहे.

News18
News18
राज्यातील हजारो बेरोजगार तरूण- तरूणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून नोकरभरतीची करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने परिवहन मंडळाकडून ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
नुकतीच माहिती मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पार पडणार आहे. तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने ही नोकर भरती केली जाणार आहे. 30, 000 रूपये इतके तरूणांना एमएसआरटीसीकडून मानधन दिले जाणार आहे.
एसटी महामंडळामध्ये कंत्राटी पद्धतीने 17 हजार 450 चालक आणि सहाय्यक यांची भरती केली जाणार आहे. संबंधित भरतीची निविदा सरकारकडून येत्या 2 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी काढली जाणार आहे. नोकरीसंबंधीची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केल्या जाणाऱ्या लोकांना एसटीकडून प्रशिक्षण मिळणार आहे. एसटी महामंडळामध्ये ही मेगाभरती समजली जात आहे. राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
2 ऑक्टोबरपासून एसटी महामंडळाकडून ही भरतीची निविदा प्रक्रिया राज्यामध्ये राबवली जाणार आहे. 1000 हून अधिक बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. त्याच अनुषंगाने ही भरती केली जाणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळान राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाने एसटी महामंडळामध्ये नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे. अद्याप वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रतासह इतरत्र माहितीचा खुलासा झालेला नाही. निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्यानंतर ते उमेदवारांना कळेल. परंतु, परिवहन मंत्र्यांनी मानधन देखील सांगितले आहे. उमेदवारांना मासिक 30,000 रूपये इतके मानधन दिले आहे. लवकरच ही भरती प्रक्रिया जाहीर होणार असून इच्छूक उमेदवारांनी नोकर भरतीची निविदा प्रक्रिया जाहीर होताच तात्काळ अर्ज भरावा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST Bus Recruitment : एसटी महामंडळाची मोठी घोषणा! 17450 पदांसाठी भरती होणार, पगार किती मिळणार? A TO Z माहिती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement