Navratri 2025: कर्णपुरा देवीची यात्रा, नवरात्रीसाठी खास तयारी, ‎या वेळेत दर्शन बंद!

Last Updated:

Navratri 2025: छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्रीत कर्णपुरा देवीची मोठी यात्रा भरते. संपूर्ण मराठवाड्यातून लाखो भाविक याठिकाणी येत असतात.

Navratri 2025: कर्णपुरा देवीची यात्रा, नवरात्रीसाठी खास तयारी, ‎या काळात दर्शन बंद!
Navratri 2025: कर्णपुरा देवीची यात्रा, नवरात्रीसाठी खास तयारी, ‎या काळात दर्शन बंद!
छत्रपती संभाजीनगर: शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रीच्या नऊ दिवस मोठी यात्रा भरते. देवीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला असून उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पोलिसांकडून सुरक्षेची तयारी करण्यात आली असून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
‎यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस व छावणी परिषदेने 130 पेक्षा अधिक अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भाविकांच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी खाद्यपदार्थ व खरेदीसाठी दालन, स्टॉलसमोर दोरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा यात्रेत शेवटच्या पाच दिवसांत रोज दोन ते अडीच लाख भाविक येण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे 24 तास पोलिस तैनात राहतील. शिवाय, 350 पोलिस अंमलदार, 6 पोलिस निरीक्षक, 30 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांचा बंदोबस्त राहील. गुन्हे शाखेची पथके साध्या वेशात तैनात असतील.
advertisement
‎यात्रेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यालगत दोन्ही बाजूंनी दुकाने थाटली जातात. यंदा 800 च्या आसपास स्टॉल, हॉटेल असतील. यासमोरच भाविकांची एकच गर्दी होते. त्यामुळे दुकानांसमोर दोरी लावण्याच्या कडक सूचना आहेत. कर्णपुरा देवीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून भाविक येतात. रात्रीतून अनेकजण पायी निघतात. रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत दर्शन बंद असेल, असे मंदिर प्रशासनाने कळवले. महिला, पुरुषांची स्वतंत्र दर्शन रांग ठेवण्याची पोलिसांनी सूचना केली.
advertisement
‎लाखोंच्या संख्येने गर्दी होणाऱ्या या यात्रेचे नियोजन व सुरक्षेच्या अनुषंगाने शुक्रवारी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा तिवारी, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त संजय सानप, छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांनी पाहणी केली. सोबत मंदिर प्रशासनासोबत चर्चा करून दर्शनाची रांग, गर्दीबाबत चर्चा करून सूचना केल्या.
‎पोलिसांकडून सूचना
‎1) रस्त्यावर एकही स्टॉल लागणार नाही. प्रवेशद्वारापासून वाहनांस बंदी असेल.
advertisement
‎2) सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिराच्या आवारातील शेजारील परिसर पत्रे लावून बंद. 130 वर अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील.
3) सर्व झाडांच्या फांद्या काढण्यात येणार आणि स्वच्छतेसाठी विशेष पथके असतील.
‎4) 24 तास फूड आणि महावितरणचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Navratri 2025: कर्णपुरा देवीची यात्रा, नवरात्रीसाठी खास तयारी, ‎या वेळेत दर्शन बंद!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement