पंचमुखी शिव, रुद्राक्षाची झाडे अन् निसर्गाची शिदोरी, वेरूळचं ‘महादेव वन उद्यान’ एकदा बघाच..! Video

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Tourism: छत्रपती संभाजीनगर वनविभाग अंतर्गत खुलताबाद वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत वेरूळ येथील महादेव वन उद्यान आहे. पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.

+
पंचमुखी

पंचमुखी शिव, रुद्राक्षाची झाडे अन् निसर्गाची शिदोरी, वेरूळचं ‘महादेव वन उद्यान’ एकदा बघाच..! Video

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 'महादेव वनउद्यान' हे एक अद्वितीय, अध्यात्माशी निसर्गाची सांगड घालणारे ठिकाण ठरत आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या पायथ्याशी हे वनउद्यान वनविभागातर्फे उभारण्यात आले असून, ते शेकडो भक्तांसाठी एक निसर्गसंपन्न ठिकाण ठरत आहे. 12 एकरातील या वनउद्यानात सुमारे 47 प्रजातींची वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच महादेवाच्या 3 पिंड असून पंचमुखी आणि एकमुखी शिल्प आहे.
छत्रपती संभाजीनगर वनविभाग अंतर्गत खुलताबाद वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत वेरूळ येथील महादेव वन उद्यान आहे. हे उद्यान एकूण पाच हेक्टरमध्ये आहे. वेरूळ येथे लेणी, घृष्णेश्वर मंदिर, कैलास लेणे आहे, त्या अनुषंगाने वनविभागाची देखील महादेवाच्या नावाचे अध्यात्मिक, निसर्गरम्य वन असावे, या प्रकारची संकल्पना होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे वनविभाग अधिकारी संदीप मोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
advertisement
'महादेव' वन उद्यानात महादेवाला आवडणारी पांढरी फुले, चाफा, पारिजातक, रातराणी, मोहा, गुलमोहर यासह बेलवन, तीन पानी बेल, पाच पानी बेल, रुद्राक्षाची झाडे आहेत. तसेच बांबूची झाडे आणि यासारख्या विविध प्रकारच्या फुलांच्या झाडांची लागवड येथे करण्यात आली आहे.
घृष्णेश्वर, लेणी या ठिकाणाहून दर्शन घेऊन तसेच प्रवास करून आल्यानंतर पर्यटक कुठेतरी विसावा मिळावा म्हणून या 'महादेव वन उद्यानात' येतात, भोजनाचा आस्वाद घेतात. तसेच पर्यटकांना झाडांची माहिती मिळावी म्हणून प्रत्येक झाडाच्या बाजूला माहिती फलक लावण्यात आले आहेत. तसेच या उद्यानात' पंचमुखी, एकमुखी आणि त्रिमुखी शिवमूख, त्रिशूल, डमरू, ओंकार, नंदी, गणेश, पार्वती, कार्तिकेय, गंगा, रुद्राक्ष, कमळ सरोवर अशा बारा आकर्षक मूर्ती उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील मोरे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/Travel/
पंचमुखी शिव, रुद्राक्षाची झाडे अन् निसर्गाची शिदोरी, वेरूळचं ‘महादेव वन उद्यान’ एकदा बघाच..! Video
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement