Navratri 2025: तुळजाभवानी घेणार विश्रांती! आजपासून सुरू होणार देवीची मंचकी निद्रा

Last Updated:

Navratri 2025: महाराष्ट्राचं कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीची 'मंचकी निद्रा' आजपासून (14 सप्टेंबर) सुरू होत आहे.

Navratri 2025: तुळजाभवानी घेणार विश्रांती! आजपासून सुरू होणार देवीची मंचकी निद्रा
Navratri 2025: तुळजाभवानी घेणार विश्रांती! आजपासून सुरू होणार देवीची मंचकी निद्रा
तुळजापूर: यावर्षी, 22 सप्टेंबरपासून (सोमवार) शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या तुळजापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीची 'मंचकी निद्रा' आजपासून (14 सप्टेंबर) सुरू होत आहे. रविवारी संध्याकाळी पंचामृत अभिषेक झाल्यानंतर देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. ही निद्रा 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर दुपारी तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात होईल.
तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस 'घोरनिद्रा' असंही म्हणतात. महिषासुराच्या विरोधात झालेल्या युद्धापूर्वी देवी घोरनिद्रेत होती. या घोर निद्रेनंतर देवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं आणि त्याचा वध केला, असे दाखले पुराणांमध्ये दिले गेले आहेत. दहाव्या दिवशी विजयादशमीचं औचित्य साधून तुळजाभवानी देवीला पहाटे पालखीत ठेवून मंदिर प्रदक्षिणा घालून सीमोल्लंघन सोहळा साजरा केला जातो.
advertisement
विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन झाल्यानंतर देवीला अहिल्यानगरहून (अहमदनगर) आलेल्या पालखीत बसवून देवीला पुन्हा मंचकावर निद्रेसाठी ठेवतात. या निद्रेला 'श्रमनिद्रा' असं म्हणतात. ही निद्रा पाच दिवस चालते. या निद्राकाळात शुभकार्य वर्ज्य मानले जाते. त्यामुळे या कालावधीत तुळजापुरातील रहिवासी, देवीचे भक्त आणि पुजारी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत नाहीत. या कालावधीत पलंग, गादी, उशी या बाबीही वर्ज्य मानल्या जातात.
advertisement
हिंदू धर्मात चैत्र आणि शारदीय नवरात्री उत्सव मोठे सण म्हणून साजऱ्या केल्या जातात. थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीतीला सुरुवात होणार आहे. यावर्षी, 22 सप्टेंबरपासून (सोमवार) शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते. नवरात्रीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: तुळजाभवानी घेणार विश्रांती! आजपासून सुरू होणार देवीची मंचकी निद्रा
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement