Ekvira Devi Temple : नवरात्रीनिमित्ताने कार्ला परिसरात वाहतुकीत बदल! हे रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

Navratri Festival 2025 : नवरात्र उत्सव 2025 निमित्ताने कार्ला परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. उत्सव दरम्यान मुख्य रस्ते बंद राहणार आहेत, त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्ग वापरणे आवश्यक आहे

News18
News18
पुणे : कार्ला भागात नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीवर ताण येतो. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावरची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या काळात काही रस्त्यांवर अवजड आणि मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे तसेच पर्यायी मार्गांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वाहतुकीवरील असे असतील निर्बंध 
दि. 27 सप्टेंबर 2025 पासून दि. 01 ऑक्टोबर 2025 पर्यंत दररोज सकाळी 6 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत काही मार्गांवर निर्बंध लागू राहतील.
जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि पुणे–मुंबई महामार्गावरील लोणावळा कुसगाव बुद्रुक टोलनाका ते वडगाव फाटा, वडगाव मावळ या दरम्यान मोठ्या आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद राहिल. लहान वाहने आणि भाविकांसाठी मात्र वाहतूक सुरू राहील.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
मोठी आणि अवजड वाहने यांना दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे:
पुण्याकडे जाणारी वाहने :
जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाक्यापासून ही वाहने थेट एक्सप्रेस हायवे वर वळवली जातील. त्यानंतर उर्से टोलनाका मार्गे ही वाहने सुरक्षितपणे पुणे शहराकडे जाऊ शकतील.
मुंबईकडे जाणारी वाहने : पुणे–मुंबई महामार्गावरील वडगाव येथील तळेगाव फाटा पासून ही वाहने वळवून उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेवर नेण्यात येतील. त्यानंतर ही वाहने थेट मुंबईकडे जाऊ शकतील.
advertisement
प्रशासनाचे आवाहन
नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक कार्ला येथे दर्शनासाठी येतात. गर्दीमुळे अपघाताचा धोका तसेच वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी यांनी आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित व्हावे, भाविकांना त्रास होऊ नये आणि सुरक्षिततेत व्यत्यय येऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ekvira Devi Temple : नवरात्रीनिमित्ताने कार्ला परिसरात वाहतुकीत बदल! हे रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement