तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस 'घोरनिद्रा' असंही म्हणतात. महिषासुराच्या विरोधात झालेल्या युद्धापूर्वी देवी घोरनिद्रेत होती. या घोर निद्रेनंतर देवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं आणि त्याचा वध केला, असे दाखले पुराणांमध्ये दिले गेले आहेत. दहाव्या दिवशी विजयादशमीचं औचित्य साधून तुळजाभवानी देवीला पहाटे पालखीत ठेवून मंदिर प्रदक्षिणा घालून सीमोल्लंघन सोहळा साजरा केला जातो.
advertisement
Navratri 2025: नवरात्रीत तुळजाभवानीचं दर्शन महागलं! मंदिर प्रशासनाच्या प्रसिद्धीपत्रकाने गोंधळ
विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन झाल्यानंतर देवीला अहिल्यानगरहून (अहमदनगर) आलेल्या पालखीत बसवून देवीला पुन्हा मंचकावर निद्रेसाठी ठेवतात. या निद्रेला 'श्रमनिद्रा' असं म्हणतात. ही निद्रा पाच दिवस चालते. या निद्राकाळात शुभकार्य वर्ज्य मानले जाते. त्यामुळे या कालावधीत तुळजापुरातील रहिवासी, देवीचे भक्त आणि पुजारी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत नाहीत. या कालावधीत पलंग, गादी, उशी या बाबीही वर्ज्य मानल्या जातात.
हिंदू धर्मात चैत्र आणि शारदीय नवरात्री उत्सव मोठे सण म्हणून साजऱ्या केल्या जातात. थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीतीला सुरुवात होणार आहे. यावर्षी, 22 सप्टेंबरपासून (सोमवार) शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात घटस्थापना करून देवीची आराधना केली जाते. नवरात्रीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते.