TRENDING:

तहसीलदाराला मागितली 15 लाखांची खंडणी, वकिलावर गुन्हा दाखल; महसूल विभागात खळबळ

Last Updated:

तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव: तुळजापूर तहसीलदारदारालाच मंडळ अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याकडे तक्रार मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी त्यांचेच सहकारी मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

तहसीलदार अरविंद शंकरराव बोळंगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार बोळंगे हे तुळजापूर येथे कार्यरत असून, त्यांच्या अंतर्गत आरळी बु. येथे मंडळ अधिकारी म्हणून दिनेश बहिरमल हे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

दिनेश बहिरमल यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते, ज्याची सुमारे ४ लाख रुपये थकबाकी होती. बँकेच्या वसुलीसाठी येणाऱ्या फोन कॉल्ससाठी बहिरमल यांनी 'कार्यालय प्रमुख' म्हणून तहसीलदार बोळंगे यांचा मोबाईल नंबर दिला होता. विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असताना बँकेच्या वसुली विभागाकडून तहसीलदारांना वारंवार फोन येऊ लागले. याबाबत तहसीलदारांनी बहिरमल यांना फोन करून जाब विचारला असता, बहिरमल यांनी उलट त्यांच्या विरोधात आनंदनगर (धाराशिव) पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. व त्यात गुन्हा देखील झाला आहे.

advertisement

15 लाख रुपयांची मागणी

आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी दिनेश बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोडके (रा. ढोकी) यांनी तहसीलदार बोळंगे यांच्याकडे पैशांची मागणी सुरू केली.सुरुवातीला प्रकरण मिटवण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली.त्यानंतर तडजोड म्हणून 10 लाख रुपये आणि माफीनाम्याची मागणी केली. शेवटी माफीनामा नाही दिला तरी चालेल, पण 2 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे करण्यात आली. 6 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास आरोपी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके हे तहसीलदार बोळंगे यांच्या तुळजापूर येथील घरी गेले. तिथे त्यांनी पैसे पाठवण्यासाठी शहाजी अभिमान कांबळे (रा. ढोकी) यांच्या बँक खात्याचा तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि पैसे दिल्यास पुन्हा त्रास होणार नाही, असे सांगितले.

advertisement

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीसोडून घेतला धाडसी निर्णय, तरुणाचा मिसळ व्यवसाय हिट, महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि ॲड. बालाजी बोडके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(३) (खंडणी) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे करीत आहेत.दरम्यान नएका मंडळ अधिकाऱ्याने चक्क आपल्याच तहसीलदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून खंडणी मागितल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तहसीलदाराला मागितली 15 लाखांची खंडणी, वकिलावर गुन्हा दाखल; महसूल विभागात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल